माझ्या बायकोला माहित नाही तेवढे...; कुशल बद्रिके व श्रेया बुगडेचं ‘सीक्रेट’ तुम्हाला माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 11:50 IST2022-03-10T11:49:55+5:302022-03-10T11:50:05+5:30

‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike ) आणि श्रेया बुगडे  (Shreya Bugde ) यांची मैत्री तुम्हाला ठाऊक आहेच. दोघंही जिगरी यार आहेत. पण या दोघांचं एक सीक्रेट कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल.

Chala Hawa Yeu Dya FAME shreya bugde reveals kushal badrike secrets | माझ्या बायकोला माहित नाही तेवढे...; कुशल बद्रिके व श्रेया बुगडेचं ‘सीक्रेट’ तुम्हाला माहितीये?

माझ्या बायकोला माहित नाही तेवढे...; कुशल बद्रिके व श्रेया बुगडेचं ‘सीक्रेट’ तुम्हाला माहितीये?

चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) फेम अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike ) आणि श्रेया बुगडे  (Shreya Bugde ) यांची मैत्री तुम्हाला ठाऊक आहेच. दोघंही जिगरी यार आहेत. पण या दोघांचं एक सीक्रेट कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. होय, कुशलने स्वत: या सीक्रेटचा खुलासा केला आहे.  कुशल बद्रिके आणि रोहिणी हट्टंगडी यांनी नुकतीच ‘किचन कल्लाकार’च्या मंचावर हजेरी लावली. या निमित्ताने कुशलने हे सीक्रेट उघड केलं.

‘किचन कल्लाकार’च्या निमित्ताने त्याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘माझ्या बायकोला माहित नाहीत, तेवढे माझे सीक्रेट श्रेया बुगडेला माहित आहेत. त्यामुळे ती अँकर असलेल्या शोवर जाताना काळजात धडधडत होतंच. शूटींगच्या दरम्यान लक्षात आलं की माझं ते धडधडण उगाच नव्हतच... अँकर म्हणून श्रेया किच्चन कल्लाकार मध्ये धुमाकूळ घालते. पण प्रत्यक्ष आयुष्यात तिचे किचनमधले प्रताप आम्ही (हवा येऊ द्या टीम) आवडीने चघळतो. पण सूड म्हणून ती एक दिवस आम्हाला अशी उघड्यावर पाडेल, असं मात्र वाटलं नव्हतं.’
श्रेया व कुशल सेटवर अगदी वर्गातल्या दोन खट्याळ मुलांसारखे वागतात. भांडणं, भंकस, मारामारी सेटवर संपूर्ण दंगा असं त्यांचं सुरू असतो. अगदी ते दोघं सेटवर नसले की बाकीच्यांना शुटींग सुरू आहे असं वाटतंच नाही. मागच्या साडे सात वर्षांपासून दोघंही एकत्र काम करत आहेत.

नांगी तोडायला गेलो आणि दात तुटला.
‘किचन कल्लाकार’च्या मंचावर कुशलने अनेक धम्माल किस्से एकवले. यापैकीच एक किस्सा म्हणजे खेकड्याचा. होय, कुशलला खेकडा कसा खातात हेच मुळात माहीत नव्हतं. हा किस्सा ऐकवताना तो म्हणाला, मला खेकडा कसा खायचा यायचं नाही. माझे मित्र विजू माने ते मला म्हणाले, तू खा तर... प्रयत्न तर कर... मग मी खेकड्याची नांगी घेतली अन् दाताने  मोडली, नांगी सोबत माझीची दाढ देखील मोडली. 
  

Web Title: Chala Hawa Yeu Dya FAME shreya bugde reveals kushal badrike secrets