विनोदवीर भाऊ कदम यांनी साजरा केला लग्नाचा वाढदिवस; पत्नीला दिलं खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 02:37 PM2023-08-31T14:37:43+5:302023-08-31T14:39:10+5:30

अलिकडेच भाऊने लग्नचा वाढदिवस साजरा केला.

Chala Hawa Yeu Dya fame Bhau Kadam Gift To Mamata Kadam On Anniversary | विनोदवीर भाऊ कदम यांनी साजरा केला लग्नाचा वाढदिवस; पत्नीला दिलं खास गिफ्ट

Bhau Kadam

googlenewsNext

चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे भाऊ कदम. उत्तम विनोदशैली आणि दमदार अभिनयकौशल्य यांच्या जोरावर भाऊने प्रेक्षकांना कमी काळात आपलंसं केलं. अलिकडेच भाऊने लग्नचा वाढदिवस साजरा केला. पत्नी ममताला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक खास भेटवस्तूही दिली. भाऊ कदम यांची लेक मृण्यमी कदमने आपल्या युट्यूब चॅनलवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

भाऊ कदम यांनी कुटुंबासोबत लग्नाच्या वाढदिवसाचे घरच्या घरी सेलिब्रेशन केले.  त्यांनी पत्नीला सुंदर असे कानातले गिफ्ट केले आहेत. तर ममता कदम यांनीही भाऊ कदम यांना सोन्याचे ब्रेसलेट भेट म्हणून दिलं आहे. भाऊ कदम यांच्या लेकीने शेअर केलेल्या या व्हिडीओ अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. 

नुकतेच सोशल मीडियावर भाऊ कदम यांनी लग्नाचे काही फोटो पोस्ट केले होते.  हे फोटो पाहून अनेकांनी पुन्हा एकदा त्याच्या साधेपणाचं कौतुक केलं. या फोटोमध्ये भाऊ त्याच्या पत्नीसोबत दिसून येत आहे.  पोस्टमध्ये भाऊ कदम आणि त्याच्या पत्नीचे दोन फोटो आहेत. यात एक फोटो लग्नमंडपातील आहे. तर, दुसरा फोटो स्टुडिओमध्ये काढल्याचं दिसून येत आहे.

उत्तम अभिनय शैलीद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसविणाऱ्या भाऊने अनेक मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे.  पांडू, नशीबवान, टाईमपास, व्हिआयपी गाढव, सायकल, जिंदगी विराट,घे डबल, हाफ तिकीट यांसारख्या सिनेमात त्याने काम केलं आहे. अगदी साध्या कुटुंबातून आलेला भाऊ कदम इतकी प्रसिद्धी मिळवूनही पाय जमिनीवर रोवून आहे.

Web Title: Chala Hawa Yeu Dya fame Bhau Kadam Gift To Mamata Kadam On Anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.