'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे यांच्या आईचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 14:53 IST2023-03-09T14:11:59+5:302023-03-09T14:53:02+5:30

चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे यांच्या आईचं आज पहाटे निधन झालंय.

Chala hawa yeu dya fame bharat ganeshpure mother passed away | 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे यांच्या आईचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे यांच्या आईचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे यांची आई श्रीमती. मनोरमाबाई त्र्यंबकराव गणेशपुरे यांचे आज दिनांक 9 मार्च 2023 रोजी पहाटे वृद्धापकाळाने गुरुवारी पहाटे ४.३० निधन झाले. अमरावतीमधल्या राहत्या घरी त्यांनी श्वेटचा श्वास घेतला.  गुरुवारीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ५.३० वाजता रहाटगाव येथील मुक्तगड सान्वी बिल्डींग या निवासस्थानातून निघणार आहे.

मनाेरमाबाई यांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार अमरावती येथील दिशा फांऊडेशनने मृत्युपश्चात नेत्रदानाची प्रक्रिया सकाळीच पार पडली. मनोरमाबाई यांना एकूण चार अपत्ये होती.  त्यापैकी एक मुलगा, एका मुलीचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात भारत, मनीष ही दोन मुले, स्नुषा नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. 

मराठी कलाविश्वातील दिग्गज विनोदी कलाकारांपैकी एक म्हणजे भारत गणेशपुरे.  गेली अनेक वर्षे 'झी' मराठी वरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. भारत गणेशपुरे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. 

Web Title: Chala hawa yeu dya fame bharat ganeshpure mother passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.