'चला हवा येऊ द्या ' फेम अंकुर वाढवे अडचणीत, म्हणाला - 'त्याच्याशी माझा...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 18:06 IST2022-12-30T18:05:37+5:302022-12-30T18:06:02+5:30
Ankur Wadhave:अंकुर वाढवे अडचणीत सापडला आहे. खुद्द त्यानेच ही माहिती दिली आहे.

'चला हवा येऊ द्या ' फेम अंकुर वाढवे अडचणीत, म्हणाला - 'त्याच्याशी माझा...'
झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) शोमधून सर्व कलाकार घराघरात पोहचले आहेत. या शोमधून अभिनेता अंकुर वाढवे( Ankur Wadhave)ला देखील चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. दरम्यान अंकुर वाढवे अडचणीत सापडला आहे. अंकुरचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. खुद्द त्यानेच ही माहिती दिली आहे. अंकुरने सायबर पोलिसात धाव घेतली असून या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
अभिनेता अंकुर वाढवे सोशल मीडियावर सक्रीय असून तो चाहत्यांना अपडेट देत असतो. मात्र फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यावरून अश्लील गोष्टी पोस्ट होऊ लागल्या होत्या. ही गोष्ट अंकुरच्या लक्षात येताच त्यानं थेट सायबर पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर त्वरित याची माहिती त्याने त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे.
अंकुरचं फेसबुक पेज हँक झाल्याचं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले आहे. तसेच त्याने सायबर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीची प्रत देखील शेअर केली आहे. त्याने पोस्ट शेअर करत म्हटले की, मित्रानो माझे फेसबुकचे पेज काही दिवसांपासून हॅक झालेले आहे त्यावर जे पोस्ट होतंय त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही बऱ्याच मित्रांनी मला कॉल व मेसेज करून याबद्दल माहिती देवून चिंता व्यक्त केली तदसंबंधी मी आजच सायबर ला तक्रार दाखल केलीय काळजी नसावी आणि असच पाठीशी उभे रहा धन्यवाद!
पुढे त्याने म्हटले की, सतर्क राहा माझ्या या पेज वरून काहीही मेसेज आला तर दुर्लक्षित करा नशिबाने अजून तसे कोणाला मेसेज नाही आले
ही महिती माझ्या व तुमच्याही मित्रांपर्यंत पोहोचवा.