Chala Hava Yeu Dya : स्वप्नील जोशीचं हसणं स्क्रीप्टेड असतं का? प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नाला निलेश साबळेंचं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 02:38 PM2022-10-13T14:38:52+5:302022-10-13T14:40:45+5:30

Chala Hava Yeu Dya : शोमध्ये बॅकग्राऊंडला प्रेक्षकांच्या हसण्याचा येणारा आवाज खरा असतो का? स्वप्नील जोशीचं हसणं स्क्रीप्टेड असतं का? तुम्हीही या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यास उत्सुक असाल तर आता खुद्द निलेश साबळे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

Chala Hava Yeu Dya Nilesh Sabale Talk About Swapnil Joshi Laugh | Chala Hava Yeu Dya : स्वप्नील जोशीचं हसणं स्क्रीप्टेड असतं का? प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नाला निलेश साबळेंचं उत्तर...

Chala Hava Yeu Dya : स्वप्नील जोशीचं हसणं स्क्रीप्टेड असतं का? प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नाला निलेश साबळेंचं उत्तर...

googlenewsNext

नमस्कार मंडळी, हसताय ना... हसायलाच पाहिजे, असं म्हणत दीर्घकाळापासून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा झी मराठीवरचा ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya) हा प्रेक्षकांचा अतिशय लाडका कार्यक्रम.  सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे (Nilesh Sabale) आणि श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. टीव्हीवर हा कार्यक्रम बघताना हसून हसून पोट दुखतं. पण या शोबद्दल प्रेक्षकांना काही प्रश्न नेहमी पडताात. होय, शोमध्ये बॅकग्राऊंडला प्रेक्षकांच्या हसण्याचा येणारा आवाज खरा असतो का? स्वप्नील जोशीचं ( Swapnil Joshi) हसणं हे स्क्रीप्टेड असतं का? असे हे प्रश्न. तुम्हीही या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यास उत्सुक असाल तर आता खुद्द निलेश साबळे यांनी प्रेक्षकांच्या मनातल्या या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

झी मराठीच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न..., असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात निलेश साबळे प्रेक्षकांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर देताना दिसत आहेत.

ते म्हणतात, ‘कधी प्रेक्षकांना हा प्रश्न पडतो की स्कीट सादर होताना समोर जे बसतात, ते पाहुणे कलाकार, प्रेक्षक आणि स्वप्नील जोशी खरंच हसत असतील का? तर मी आज या मंचाची शपथ घेऊन सांगतो की, या लोकांना हसण्यासाठी आम्ही कधीच सांगत नाही की आज तुम्ही जोरात हसा. किंबहुना आमची तसं करण्याची हिंमतही नाही आणि असं करूही नये. तुम्हालाही ही जादू अनुभवायची असेल तर तुम्ही झी मराठीशी संपर्क साधा आणि इथे येऊन याचा आनंद घ्या...’

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आजपर्यंत अनेक सेलिब्रिटी आले.अगदी मराठीसह बॉलिवूड, टॉलिवूडचे कलाकारही या मंचावर दिसले. या कलाकारांनाही या शोने खळखळून हसवलं.  सध्या सोशल मिडीयावर अभिनेत्री विद्या बालनचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विद्या ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमिक शोमधील एका मजेशीर प्रसंगावर लिपसिंग करताना दिसते आहे. विद्याने हा मजेशीर व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल होतो आहे.

Web Title: Chala Hava Yeu Dya Nilesh Sabale Talk About Swapnil Joshi Laugh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.