शाहरुखच्या 'कोई मिल गया...' गाण्यावर थिरकले 'ठरलं तर मग'मधले चैतन्य आणि कुसूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:20 IST2025-01-14T18:19:13+5:302025-01-14T18:20:01+5:30
Chaitanya Sardeshpande And Disha Danade : चैतन्य सरदेशपांडे आणि दिशा दानडे यांनी सोशल मीडियावर रिल शेअर केला आहे. या रिलमध्ये चैतन्य आणि दिशा शाहरुख खानच्या कुछ कुछ होता है या सिनेमातील 'कोई मिल गया...' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

शाहरुखच्या 'कोई मिल गया...' गाण्यावर थिरकले 'ठरलं तर मग'मधले चैतन्य आणि कुसूम
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag). या मालिकेतील सायली आणि अर्जुनच्या केमिस्ट्रीला चाहत्यांची पसंती मिळते. सायली आणि अर्जुनसोबत कुसूम आणि चैतन्य या दोन्ही पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. चैतन्यची भूमिका अभिनेता चैतन्य सरदेशपांडे(Chaitanya Sardeshpande)ने साकारली आहे. तर कुसुमची भूमिका अभिनेत्री दिशा दानडे (Disha Danade) हिने साकारली आहे. ते दोघे सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि नुकतेच त्या दोघांनी शाहरुख खानच्या एका गाण्यावरील डान्सचा रिल शेअर केला आहे. या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
चैतन्य सरदेशपांडे आणि दिशा दानडे यांनी सोशल मीडियावर रिल शेअर केला आहे. या रिलमध्ये चैतन्य आणि दिशा शाहरुख खानच्या कुछ कुछ होता है या सिनेमातील 'कोई मिल गया...' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्या दोघांनी शूटिंगमधून वेळ काढत हा रिल सेटवर शूट केलाय. त्या दोघांनी या गाण्यावर खूप छान डान्स केला आहे. त्यांच्या या रिलला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. या व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
'ठरलं तर मग' मालिकेबद्दल
'ठरलं तर मग' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. सायली आणि अर्जुन यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याचे सुभेदार कुटुंबाला आणि मधुभाऊंना कळते. ते त्या दोघांवर चिडतात. सुभेदार सायलीला घराबाहेर काढतात. मधुभाऊदेखील सायलीला कुसूमच्या घरी घेऊन येतात. दोघांच्या घरी त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण झालाय. त्यात अर्जुन सायलीवर असलेले त्याचे प्रेम व्यक्त करतो. मात्र मधुभाऊंना दिलेल्या वचनामुळे सायलीला अर्जुनला भेटता आणि बोलताही येत नाही. त्यामुळे अर्जुन मधुभाऊंना मनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्या घरातील लोकांमधला सायलीबद्दलचा गैरसमजही दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे सायली आणि अर्जुन पुन्हा कसे आणि कधी एकत्र येणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.