‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 15:57 IST2020-04-13T15:55:43+5:302020-04-13T15:57:10+5:30

स्वत: केला खुलासा

chahatt khannas sister and yeh rishta kya kehlata hai star simran khanna gets divorced from husband bharat dudani-ram | ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, वाचा सविस्तर

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, वाचा सविस्तर

ठळक मुद्देसिमरन ही टीव्ही स्टार चाहत खन्नाची बहीण आहे. 

टीव्ही स्टार चाहत खन्ना आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री सिमरन खन्ना हिने पतीपासून घटस्फोट घेतला आहे. होय, सिमरनने पती भरत दुदानीपासून घटस्फोट घेतला. तिने स्वत: याचा खुलासा केला.
एका ताज्या मुलाखतीत तिने याबद्दल माहिती दिली. मी व भरत आता एकत्र नाही. आमचा घटस्फोट झाला आहे. पण असे असले तरी आमच्या नात्यात कुठलीही कटुता नाही. आम्हाला एक मुलगा आहे. माझ्या मुलाची कस्टडी भरतकडे आहे. मी नेहमी माझा मुलगा विनीतला भेटायला जाते, असे तिने सांगितले.

काही दिवसांपूर्वी सिमरन व भरत यांच्या वैवाहिक आयुष्यात कुरबुरी सुरु झाल्याची बातमी होती. यानंतर अचानक दोघांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली.

टीव्ही स्टार सिमरनने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेत गायत्री गोयंका उर्प गायूची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीची लोकप्रिय झाली होती. यानंतर सिमरनने अनेक मालिकांमध्ये काम केले. वो सिमरन, परमावतार श्री कृष्णा, कृष्णाबेन खाखरावाला, उडान-सपनों की अशा अनेक मालिकांमध्ये ती दिसली.

चाहत खन्नाची बहीण आहे सिमरन
सिमरन ही टीव्ही स्टार चाहत खन्नाची बहीण आहे. चाहतचाही घटस्फोट झाला आहे.लग्नानंतर 5 वर्षांनी चाहतने पती फरहान मिर्झापासून घटस्फोट घेतला होता. चाहतही एका मुलाची आई आहे. विशेष म्हणजे, तिच्या मुलाची कस्टडीही तिच्याकडे आहे. 

अलीकडे चाहत खन्नाने सिंगर मिका सिंगसोबतचे रोमॅन्टिक फोटो व्हायरल झाले होते. यानंतर चाहत व मिका यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण हे रोमॅन्टिक फोटो चाहत व मिकाच्या आगामी व्हिडीओ सॉन्गचे होते.

Web Title: chahatt khannas sister and yeh rishta kya kehlata hai star simran khanna gets divorced from husband bharat dudani-ram