'सेलिब्रेटी मास्टरशेफ'च्या परीक्षकांनी उषा ताईंचं जेवण टेस्ट करण्यास दिला नकार, संतापले लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:59 IST2025-02-04T15:58:36+5:302025-02-04T15:59:24+5:30

Usha Nadkarni : 'सेलिब्रेटी मास्टरशेफ'चा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात जज शेफने 'पवित्र रिश्ता' फेम मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेण्यास नकार दिला आहे.

'Celebrity Master Chef' judges refuse to test Usha Tai's food, people are angry | 'सेलिब्रेटी मास्टरशेफ'च्या परीक्षकांनी उषा ताईंचं जेवण टेस्ट करण्यास दिला नकार, संतापले लोक

'सेलिब्रेटी मास्टरशेफ'च्या परीक्षकांनी उषा ताईंचं जेवण टेस्ट करण्यास दिला नकार, संतापले लोक

'सेलिब्रेटी मास्टरशेफ'चा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात जज शेफने 'पवित्र रिश्ता' फेम मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेण्यास नकार दिला आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी उषा नाडकर्णी यांच्यावरच नाराजी व्यक्त केली आहे. कुकिंगवर आधारित या शोचे फराह खान, विकास खन्ना आणि रणवीर ब्रार जज करत आहेत. या शोच्या एका एपिसोडची ही झलक सर्वांनाच चकित करणारी आहे.

शोच्या निर्मात्यांनी अलीकडेच 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये परीक्षकांनी उषा नाडकर्णी यांनी बनवलेले जेवण चाखण्यास नकार दिला आहे. या व्हिडीओमध्ये फराह उषा ताईंना विचारते की त्यांनी काय बनवले आहे? तर उत्तर देताना त्यांनी म्हटले, ड्राय चिकन. यानंतर, परीक्षक तपासतात तेव्हा उषा ताईंनी विचारले की, काय झाले? फराह म्हणाली की, ते पूर्णपणे कच्चे आहे. यावर रणवीर ब्रार म्हणतो की, खाल्लं तर आजारी पडू. यावर उषाताई म्हणाल्या की मी चाकूने पाहिले शिजले आहे की नाही. यावर फराह म्हणते की, जेव्हा शेफ तुम्हाला त्यांचे ऐकायला सांगतात तेव्हाच. यावर उषाताई पलटवार करतात आणि म्हणाल्या, मग मला बोलायला हवं. फराह पुन्हा म्हणाली की, कधी कधी तुम्ही ऐकत नाहीस.


''उषा ताई खरंच खूप उद्धट आहेत''
आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक उषा ताईंवर संतापले आहे. एका युजरने लिहिले की, उषा ताई खरेच खूप उद्धट, चिडखोर आहेत. आम्ही त्यांच्या वयाचा आदर करतो, पण त्यांनीही सर्वांचा आदर केला पाहिजे. एकाने म्हटले की, त्या नेहमी वृद्धापकाळाचे कार्ड वापरण्याचा प्रयत्न करतात आणि कोणाचेही ऐकू इच्छित नसतात.

Web Title: 'Celebrity Master Chef' judges refuse to test Usha Tai's food, people are angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.