'नकुशी', 'पुढचं पाऊल','दुहेरी', 'गोठ' आणि 'आम्ही दोघे राजा राणी' मालिकांमध्ये होळीचे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 19:38 IST2017-03-10T14:08:54+5:302017-03-10T19:38:54+5:30

होळी रे होळी... पुरणाची पोळी.... असा आवाज घुमू लागलाय.... होळीचा रंग चढु लागलाय. मग आपले सेलिब्रेटी तरी कसे मागे ...

Celebrating Holi in 'Nukushi', 'Next Step', 'Doubri', 'Goth' and 'We Are King Raji' among the series. | 'नकुशी', 'पुढचं पाऊल','दुहेरी', 'गोठ' आणि 'आम्ही दोघे राजा राणी' मालिकांमध्ये होळीचे सेलिब्रेशन

'नकुशी', 'पुढचं पाऊल','दुहेरी', 'गोठ' आणि 'आम्ही दोघे राजा राणी' मालिकांमध्ये होळीचे सेलिब्रेशन

ळी रे होळी... पुरणाची पोळी.... असा आवाज घुमू लागलाय.... होळीचा रंग चढु लागलाय. मग आपले सेलिब्रेटी तरी कसे मागे राहणार.त्यामुळे ते ही उधळतायेत प्रेमाचे रंग. 'नकुशी', 'पुढचं पाऊल', 'दुहेरी', 'गोठ' आणि 'आम्ही दोघे राजा राणी' मालिकांमध्ये छोट्या पडद्यावरची होळी यंदा केवळ औपचारिकता म्हणून होळी पेटवणे आणि रंगपंचमी खेळणे इतपत सीमित राहणार नसून ही होळी संस्मरणीय करण्यासाठी जल्लोषात हा सण साजरा होणार आहे.



‘नकुशी’मधला उपेंद्र लिमये अर्थात रणजीत शिंदेच्या चाळीतली होळी यंदा आगळीवेगळी ठरणार आहे.होळीच्या दिवशी सौरभ चाळीत येतो. नकुशी,रणजीत आणि सौरभ समोरासमोर येत्तात,सोबत रणजीतचे कुटुंबीय आणि चाळकरी असतात.तेव्हा काय घडते.हा भाग उत्सुकतेचा ठरणार आहे.बग्गीवाला चाळीच्या होळीत नात्यांमधल्या गैरसमजांची होळी होईल का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अर्थात चाळीतली एकापेक्षा एक धमाल पात्रे,त्यांची होळीसमोरची गाऱ्हाणी आणि धुळवडीच्या निमित्ताने त्यांनी केलेला दंगा हे यंदाच्या नकुशीच्या होळीचे वैशिष्ट्य आहे.



'आम्ही दोघे राजाराणी' मधल्या पार्थ आणि मधुराची लग्नानंतरची ही पहिली होळी.पार्थची बॉस तनुश्री आणि तिला पाठींबा देणारी पार्थची आजी यंदाच्या होळीत काय रंग उधळणार.अतरंगी लेले आणि वेंधळे नाईक कुटुंबीय कसा एकत्र कल्ला करणार,हे यंदाच्या होळीत पाहायला मिळेल.



मिलिंद फाटक आणि विनययेडेकर हे कसलेले विनोदवीर यंदाच्या होळीत दे धमाल करणार आहेत. गेली पाच वर्ष टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘पुढचे पाऊल’मध्ये अक्कासाहेबांच्या कुटुंबात कल्याणी सोबत आता तेजस्विनी आणि सायली या दोन नव्या सुना यंदाच्या होळीत सहभागी असतील.त्यात नव्या विचारांची ऑस्ट्रेलियातून आलेली सायली ही कोल्हापुरातली होळी आणि रंगपंचमीत सहभागी होईल का ? आणि तिच्या नव्या विचारांचे रंग अक्कासाहेब कसे स्वीकारतील,ही प्रेक्षकासाठी उत्सुकतेची बाब असेल.

Web Title: Celebrating Holi in 'Nukushi', 'Next Step', 'Doubri', 'Goth' and 'We Are King Raji' among the series.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.