Bigg Boss Contestant लोपामुद्रा राऊत म्हणतेय साँसू-बहू सिरीयल नो वे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2017 17:40 IST2017-04-15T12:10:13+5:302017-04-15T17:40:13+5:30
मिस इंडिया आणि बिग बॉस रियालिटी शोनंतर मॉडेल लोपामुद्रा राऊत काय करते असा प्रश्न तिच्या फॅन्सना पडला असेल. बिग ...

Bigg Boss Contestant लोपामुद्रा राऊत म्हणतेय साँसू-बहू सिरीयल नो वे!
म स इंडिया आणि बिग बॉस रियालिटी शोनंतर मॉडेल लोपामुद्रा राऊत काय करते असा प्रश्न तिच्या फॅन्सना पडला असेल. बिग बॉसच्या घरामध्ये आपल्या अदा आणि हरकतींमुळे लोपामुद्रा राऊत बरीच चर्चेत आली होती. त्यामुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून तिला विविध टीव्ही मालिका, शो आणि सिनेमाच्या ऑफर्स येत आहेत. मात्र ऑफर येत असलेल्या टीव्ही मालिकांवर लोपामुद्रा काही समाधानी नाही. तिला ऑफर झालेल्या बहुतांशी मालिका या बड्या प्रॉडक्शन हाऊसच्याच आहेत. त्यामुळे सध्या तरी छोट्या पडद्यावरील या मालिकांमध्ये काम करण्यात लोपामुद्राला फारसं स्वारस्य नाही. छोट्या पडद्यावरील सासू-सूनेचा ड्रामा आपल्याला काही जमणार नसल्याचे लोपामुद्राने सांगितले आहे. त्यामुळे अशा टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यापेक्षा लोपामुद्राला काही तरी वेगळं करण्याची इच्छा आहे. सध्या वेबसिरीजला तरुणाईची चांगली पसंती मिळत आहे. तरुणाईची आवड आणि वेबसिरीजला मिळत असलेला प्रतिसाद पाहता काहीतरी हटके वेबसिरीज करायला नक्की आवडेल असं लोपामुद्रा हिने म्हटलं आहे. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर लोपामुद्रा राऊत हिला बिग बॉससारख्या प्रसिद्ध रियालिटी शोची लॉटरी लागली होती. या शोमध्ये लोपामुद्रा अखेरच्या टप्प्यापर्यंत पोहचली होती. फॅन्सकडून लोपामुद्राला चांगला प्रतिसाद मिळत होता. विशेषतः बिग बॉसच्या घरात लोपामुद्रा आणि बानीमधला संघर्ष रसिकांना चांगलाच भावला होता. त्यामुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच लोपामुद्राला ब-याच ऑफर येत आहेत.मात्र सगळ्या ऑफर्स सरसकट न स्वीकारता आपण त्यामध्येही सिलेक्टिव्ह राहणार असल्याचे तिने स्पष्ट केलं आहे.