Bigg Boss11:नेहमीच गंभीर भाव देणारा जल्लाद हसतो तेव्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 16:53 IST2017-11-10T11:23:59+5:302017-11-10T16:53:59+5:30

बिग बॉस मध्ये सलमान खाननंतर सगळ्यांत लक्षवेधी ठरला तो म्हणजे बिग बॉसच्या घरातील जल्लाद.होय, बिग बॉसच्या प्रत्येक सिझनमध्ये सलमान ...

Bigg Boss11: When the greedy laugher always laughs! | Bigg Boss11:नेहमीच गंभीर भाव देणारा जल्लाद हसतो तेव्हा!

Bigg Boss11:नेहमीच गंभीर भाव देणारा जल्लाद हसतो तेव्हा!

ref="http://cnxmasti.lokmat.com/television/hot-gossip/bigg-boss11-shilpa-shinde-ex-boyfriend-romit-raj-to-make-a-wild-card-entry/26332">बिग बॉसमध्ये सलमान खाननंतर सगळ्यांत लक्षवेधी ठरला तो म्हणजे बिग बॉसच्या घरातील जल्लाद.होय, बिग बॉसच्या प्रत्येक सिझनमध्ये सलमान खानबरोबर जल्लाद असतोच.या जल्लादची खासियत म्हणजे तो कधीच हसत नाही. सलमान खाननेतर अनेक वेळा त्याला हसवण्याचा प्रयत्न केला.कधी त्याला गुदगुली करून तर कधी विनोद करत त्याला हसवण्याचा प्रयत्न केला.मात्र जल्लाद कधीच सलमानच्या सांगण्यावर हसला नाही. आजपर्यंत कधीही न घडलेली गोष्ट मात्र यंदाच्या सिझनमध्ये घडली.एका टास्कमध्ये स्पर्धकांमुळे जल्लादला हसु आवरले नाही आणि तो खुदकन हसल्याचे पाहायला मिळाले. यावेळी 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये  मेल कंटेस्टसवर फिमेल कंटेस्टंट व्हॅक्स करण्याचे आदेश देतात. त्यावेळी काहींच्या पायावर तर हाताचे व्हॅक्सिग करताना या मेल कंटेस्टंटची होणारी हालत बघून जल्लाद हसला . नेहमीच चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवून वावरणारा जल्लाद यावेळी वेगळ्याच रुपात दिसल्याचे पाहताना रसिकांनाही आश्चर्य वाटले.त्यावेळी स्पर्धकांपेक्षा जल्लादवर सलमानसह रसिकांच्याचीही नजरा खिळल्या होत्या. यावेळी हसताना जल्लादला पाहुन 'अरे जल्लाद हंस रहा है' असे  सलमान जोरात ओरडला. त्यानंतर सर्व कंटेस्टंटही त्याच्याजवळ जाऊन हसू लागले. बिग बॉसच्या गेल्या  7व्या  सिझनमध्ये जल्लादची एंट्री झाले.आजपर्यंत झालेल्या सिझनपैकी ही पहिलीच वेळ होती जेव्हा जल्लाद हसताना दिसला.गंभीर भाव देणारा जल्लादचे हसरे भाव पाहुन रसिकांनाही सुखद धक्काच बसल्याचे पाहायला मिळाले.

बिग बॉसमध्ये दिसणारा जल्लाद नेमका आहे तरी कोण?

जल्लाद म्हणून जेव्हा चिंतनची एंट्री होते, तेव्हा एवढ्या भयानक आणि गंभीर चेहºयाचा हा व्यक्ती कोण? असा प्रेक्षकांना नेहमीच प्रश्न पडतो. परंतु चिंतनचा इथप्रर्यंतचा प्रवास खूपच संघर्षपूर्ण असा राहिला आहे. चिंतनचा जन्म गुजरात राज्यात झाला. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून तो आई चेतना गंगर यांच्यासोबत मुंबईतील दहिसर भागात वास्तव्यास आहे.चिंतन पहिल्यांदा बिग बॉसच्या सीजन-७ मध्ये बघावयास मिळाला. असे म्हटले जाते की, सातवा सीजन सुरू होण्याअगोदर चिंतनचा एक मित्र त्याला टीम शोच्या कॉर्डिनेटरकडे घेऊन गेला होता. चिंतन बघताच कॉर्डिनेटरने त्याला स्क्रीन टेस्टकरिता सिलेक्ट केले.दुस-या दिवशी सहा लोकांना मागे टाकत चिंतन स्क्रीन टेस्टमध्ये पास झाला. त्यानंतर त्याचा बिग बॉसच्या घरातील जल्लादचा प्रवास सुरू झाला. 

Web Title: Bigg Boss11: When the greedy laugher always laughs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.