बिग बॉस : स्वामी ओम न्यायालयात हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 14:18 IST2016-12-03T13:17:43+5:302016-12-03T14:18:18+5:30

चोरीच्या गुन्ह्याचा आरोप असलेले बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम यांना साकेत न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्याविरोधात ...

Bigg Boss: Swami Om is in court | बिग बॉस : स्वामी ओम न्यायालयात हजर

बिग बॉस : स्वामी ओम न्यायालयात हजर

रीच्या गुन्ह्याचा आरोप असलेले बिग बॉसच्या घरातील सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम यांना साकेत न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते. त्यामुळे त्यांना घरातून नॉमिनेट न करताच बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. यावेळी स्वामी ओम यांच्यासोबत बिग बॉसची टीमही न्यायालयात पोहचली होती. 

स्वयंघोषित बाबा स्वामी ओम यांच्याविरोधात त्यांच्याच लहान भावाने तीन सायकलींच्या चोरीचा आरोप केला होता. त्यावरून मुख्य महानगर दंडाधिकारी सतीश अरोडा यांनी स्वामी ओमविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढत ३ डिसेंबरच्या सुनावनीला न्यायालयात हजर करण्याचे पोलिसांना आदेश दिले होते.
  
यावेळी न्यायाधीशांनी पोलिसांची चांगलीच कानउघडणीही केली होती. वारंवार आदेश देऊनही आरोपी न्यायालयात हजर राहत नाही. १४ आॅक्टोबर २०१६ला स्वामी ओम यांना न्यायालयात हजर राहणे अपेक्षित होते, परंतु ते हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळेच ८ नोव्हेंबर रोजी त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. 

दरम्यान, स्वामी ओम न्यायालयात हजर झाले असून, त्यांच्यासोबत बिग बॉसची संपूर्ण टीम न्यायालयात उपस्थित होती. बिग बॉसच्या घरातील त्यांची पुढील वाटचाल न्यायालयाच्या निर्णयावरच अवलंबून असेल.


Web Title: Bigg Boss: Swami Om is in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.