बिग बॉस सीझन ४: अमृता देशमुखला वाटतंय किरण माने जानेवारीपर्यंत राहणार बिग बॉसच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 03:52 PM2022-11-17T15:52:19+5:302022-11-17T16:01:44+5:30

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज किरण माने - विकास तर दुसरीकडे रोहित, अमृता देशमुख आणि अक्षय केळकर यांची चर्चा सुरु आहे.

Bigg Boss Season 4: Amrita Deshmukh feels that Kiran Mane will stay in the Bigg Boss house till January | बिग बॉस सीझन ४: अमृता देशमुखला वाटतंय किरण माने जानेवारीपर्यंत राहणार बिग बॉसच्या घरात

बिग बॉस सीझन ४: अमृता देशमुखला वाटतंय किरण माने जानेवारीपर्यंत राहणार बिग बॉसच्या घरात

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज किरण माने - विकास तर दुसरीकडे रोहित, अमृता देशमुख आणि अक्षय केळकर यांची चर्चा सुरु आहे. किरण माने पुन्हाएकदा विकासला लोक कशी असतात आणि जे ते बोलतात तसंच त्यांना वाटतं असे नाही हे सांगताना दिसणार आहेत. बघूया नक्की काय चर्चा आहे. 

रोहित किरण मानेबद्दल बोलताना दिसणार आहे, मला माहिती होतं किरण माने केस काढणार नाही. बच्चन साहेब आहेत ते असं कसं ? अक्षयचे म्हणणे पडले, बाहेर जायची भीती असेल कशाला टक्कल करून बाहेर जावं असं पण असू शकतं... कारण तसं त्यांनी काहीच केलं नाहीये. अमृता म्हणाली, काही सांगता नाही येत. मला नाही वाटतं त्यांना वाटतं कि ते गेमच्या बाहेर जातील. मला वाटतं ते जानेवारीनंतर पण असतील या घरात, त्यांचे फॅन्स त्यांना इथेच ठेवतील. 

दुसरीकडे, किरण माने विकासला सांगताना दिसणार आहेत, तुला कळलंना आता तू टार्गेट आहेस ते. आता तू लय मोठं टार्गेट असणार आहेस तू. त्यामुळे सावध राहा. कोणी स्तुती जरी केली ना धन्यवाद मानून वटकायचं. तो आपल्या बाजूने असतोच असे नाही. 

Web Title: Bigg Boss Season 4: Amrita Deshmukh feels that Kiran Mane will stay in the Bigg Boss house till January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.