'बिग बॉस OTT'चा नवा सीझन जुनमध्ये येणार! पण सलमान खान नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 08:56 AM2024-05-23T08:56:30+5:302024-05-23T08:57:29+5:30

या सीझनमध्ये मात्र सलमान खान दिसणार नाही. 

Bigg Boss OTT Season 3 to premiere in June, Salman Khan QUITS Bigg Boss OTT, Anil Kapoor To Host Season 3 of Controversial Reality Show | 'बिग बॉस OTT'चा नवा सीझन जुनमध्ये येणार! पण सलमान खान नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट

'बिग बॉस OTT'चा नवा सीझन जुनमध्ये येणार! पण सलमान खान नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट

Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. छोट्या पडद्याप्रमाणे ओटीटीवरही (OTT) 'बिग बॉस'ची हवा आहे. 'बिग बॉस'ची एक वेगळीच लोकप्रियता आहे. चाहत्यांना हा कार्यक्रम पाहायला आवडतो. या लोकप्रियतेचं कारण सलमान खान (Salman Khan) आहे. सलमान खानने 'बिग बॉस OTT'चा मागचा सीझन होस्ट केला होता. पण या सीझनमध्ये मात्र सलमान खान दिसणार नाही. 

'बिग बॉस OTT'चे दोन पर्व चांगलेचं गाजले. आता चाहते 'बिग बॉस OTT'च्या तिसऱ्या पर्वाची वाट पाहत आहेत. 'बिग बॉस' कधी सुरू होणार, अशी विचारणा चाहत्यांकडून होत होती. आता निर्मात्यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. 'बिग बॉस OTT'चा तिसरा सीझन जुन महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी कार्यक्रमाचा एक प्रोमो जारी केला आहे. पण, सलमान हा शो होस्ट करणार नाही.

'सिकंदर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने  'बिग बॉस'साठी त्याला वेळ देणे कठीण होणार आहे.  नव्या प्रोमोमध्ये नव्या होस्टसंदर्भात काही सकेंत देण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार 'बिग बॉस OTT'चा तिसरा सीझन अभिनेते अनिल कपूर होस्ट करणार आहेत. 'बिग बॉस'च्या या नव्या सीझनबरोबरच नव्या होस्टला पाहण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत. तर 'बिग बॉस OTT'च्या पहिल्या सीझनची दिव्या अग्रवाल विजेती ठरली होती. तर दुसऱ्या पर्वाचा विजेता एल्विश यादव झाला होता. आता या सीझनमध्ये कोणकोणते कलाकार दिसणार याबाबत आता चाहत्यांना उत्सुकता आहे. 
 

Web Title: Bigg Boss OTT Season 3 to premiere in June, Salman Khan QUITS Bigg Boss OTT, Anil Kapoor To Host Season 3 of Controversial Reality Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.