"बिग बॉसवर इतके वाईट दिवस?", शोमध्ये युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या पत्नींना पाहून भडकली देवोलिना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 03:21 PM2024-06-24T15:21:29+5:302024-06-24T15:22:01+5:30

दोन पत्नी असलेल्या अरमानला 'बिग बॉस'च्या घरात पाहून अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी भडकली आहे. देवोलिनाने X वर ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. 

bigg boss ott 3 devoleena bhattacharjee angry reaction after youtuber armaan malik enter in show with his two wifes | "बिग बॉसवर इतके वाईट दिवस?", शोमध्ये युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या पत्नींना पाहून भडकली देवोलिना

"बिग बॉसवर इतके वाईट दिवस?", शोमध्ये युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या पत्नींना पाहून भडकली देवोलिना

'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. यंदाच्या सीझनमध्ये वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेला युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन पत्नींसह सहभागी झाला आहे. अरमान मलिकने पायल आणि कृतिका या दोन पत्नींसह 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली आहे. पण, दोन पत्नी असलेल्या अरमानला 'बिग बॉस'च्या घरात पाहून अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी भडकली आहे. देवोलिनाने X वर ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. 

देवोलिना भट्टाचार्जीचं ट्वीट 

तुम्हाला वाटतं  की हे मनोरंजन आहे? नाही, हे गलिच्छ मनोरंजन आहे. हे हलक्यात घेण्याचा विचारही करू नका. कारण, हे रील नाही तर रिअल आहे. या निर्लजपणाला कोणी मनोरंजन कसं काय म्हणू शकतं? हे मला समजत नाहीये. मला हे ऐकूनच कसं तरी होतंय. ६-७ दिवसांत प्रेम होतं, मग लग्न होतं...आणि ही सेम गोष्ट पत्नीच्या बेस्ट फ्रेंडबरोबरही होतं. हे माझ्या कल्पनाशक्तीच्याच पलिकडचं आहे. 

आणि बिग बॉस तुम्हाला काय झालंय? तुमचं इतके वाईट दिवस सुरू आहेत का? की तुम्हाला हा दोन पत्नी असलेला माणूस मनोरंजक वाटतो? अशा कंटेस्टंटला आणताना तुम्ही काय विचार करता? लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत हा शो पाहिला जातो. २-३-४ लग्न करू शकतो हे नवीन पिढीला तुम्ही शिकवू इच्छिता का? सगळे आनंदित राहू शकता? ज्यांना खरंच या गोष्टीचा सामना करावा लागलाय, त्यांना जाऊन विचारा. 

यासाठीच वैवाहिक कायदा आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड(UCC) गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी कायदा हा एकच असेल. आणि समाज अशा गलिच्छ गोष्टींपासून दूर राहील. पहिली बायको असताना दुसरी पत्नी...समानतेच्या नावाखाली जर महिलांनी २-२ पती केले तर, चालेल का? 

यांचे फॉलोवर्स कोण आहेत? हेच मला कळत नाही. आणि ते त्याला का फॉलो करत आहेत? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? की नाही? नसेल तर उपचार करून घ्या. जर तुम्हाला हा निर्लजपणा बरोबर वाटत असेल तर तुमच्या आयुष्य निरर्थक आहे. याच्या पलिकडे जाऊन तुम्ही विचार करू शकत नाही आणि याबाबत काही करूही शकत नाही. तुम्ही अनेक लग्न करू शकता, नव्या पिढीला तुम्हाला ही शिकवण द्यायची आहे? २-३ लग्न करणं तुमच्यासाठी इतकं महत्त्वाचं असेल तर करा आणि घरी बसा. हा गलिच्छ विचार समाजात पसरवू नका. लोक वेडे झाले आहेत. आणि बिग बॉस मला कळत नाहीये की तुम्हाला काय झालंय...

देवोलिनाचं हे ट्वीट व्हायरल झालं आहे. तिच्या या ट्वीटवर कमेंट करत चाहत्यांनीही तिचं समर्थन केलं आहे. 

अरमान मलिक हा प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याचे युट्यूबवर ७ मिलियनपेक्षाही जास्त सबस्क्रायबर्स आहेत. अरमान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. २०११ मध्ये त्याने पायल मलिकशी लग्न केलं होतं. त्यांना चिरायू नावाचा मुलगा आहे. त्यानंतर २०१८ मध्ये पायलची बेस्ट फ्रेंड असलेल्या कृतिकाच्या प्रेमात अरमान पडला आणि तिच्याशी दुसरं लग्न केलं. अरमानच्या दोन्ही पत्नी एकाच वेळेस गरोदर असल्याने मलिक कुटुंब चर्चेत आलं होतं. अरमान मलिकला त्याच्या दोन्ही पत्नींपासून ४ मुले आहेत. 

Web Title: bigg boss ott 3 devoleena bhattacharjee angry reaction after youtuber armaan malik enter in show with his two wifes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.