Bigg Boss Marathi Finale: या तारखेला होणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 17:11 IST2018-07-19T17:09:26+5:302018-07-19T17:11:12+5:30
मेघा, सई आणि पुष्कर यांची मैत्री, सई आणि पुष्करची मैत्री, मेघाचे कार्यक्रमावरचे प्रेम, पुष्करची जिद्द, स्मिताचे प्रत्येक टास्क मन लावून खेळणं यामुळे सगळेच सदस्य प्रेक्षकांचे चाहते बनले. त्यामुळे या सगळ्यांमध्येच आता विजेता होण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.

Bigg Boss Marathi Finale: या तारखेला होणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले
छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीचा पहिला सीझन सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. घरातील सदस्यांमध्ये दिवसागणिक होणारे वाद यामुळे बिग बॉस मराठी सुरुवातीच्या काही भागातच हिट ठरला आहे.आता हा कार्यक्रमाचे पर्व शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचलं आहे.पहिल्या पर्वामध्ये सहा सदस्य पोहचले असल्याचे बिग बॉसने घोषित केले. त्यामुळे घरामध्ये सगळेच खूप खुश झाले. सई, पुष्कर, आस्ताद, स्मिता, शर्मिष्ठा आणि मेघा अंतिम सोहळ्यामध्ये पोहचले आहेत. आता सगळ्यांचे लक्ष एकाचछोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीचा पहिला सीझन सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. घरातील सदस्यांमध्ये दिवसागणिक होणारे वाद यामुळे बिग बॉस मराठी सुरुवातीच्या काही भागातच हिट ठरला आहे.आता हा कार्यक्रमाचे पर्व शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचलं आहे.पहिल्या पर्वामध्ये सहा सदस्य पोहचले असल्याचे बिग बॉसने घोषित केले. त्यामुळे घरामध्ये सगळेच खूप खु गोष्टीकडे आहे ते म्हणजे पहिल्या पर्वाचा पहिला विजेता कोण ठरणार.येत्या रविवारी म्हणजेच २२ जुलैला बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. अंतिम फेरीमध्ये पोहचलेल्या प्रत्येक सदस्यचे एकच ध्येय आहे ते म्हणजे हा खिताब जिंकण. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्य पूर्ण जिद्दीने प्रत्येक टास्क खेळले, हे घर मैत्री, भांडण, प्रेम, वाद – विवाद, वेगवेगळे टास्क, विकेंडचा डाव यामुळे चर्चेत राहिले. मेघा, सई आणि पुष्कर यांची मैत्री, सई आणि पुष्करची मैत्री, मेघाचे कार्यक्रमावरचे प्रेम, पुष्करची जिद्द, स्मिताचे प्रत्येक टास्क मन लावून खेळणं यामुळे सगळेच सदस्य प्रेक्षकांचे चाहते बनले. त्यामुळे या सगळ्यांमध्येच आता विजेता होण्यासाठी चढाओढ सुरू झाली असणार हे मात्र नक्की.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील सगळ्यात जवळच्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा आहे. अस्ताद काळेच्या आयुष्यात एक खास व्यक्ती असल्याचे त्याने या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी मान्य केले होते. त्याला या घरातून बाहेर पडल्यावर त्याच्या या खास मैत्रिणीला म्हणजेच अभिनेत्री स्वप्नाली पाटीलला भेटायचे आहे असे त्याने सांगितले. त्याचे आई वडील पुण्याला असल्याने फिनले नंतर तो पुण्याला जाणार आहे पण मी तिथे स्वप्नालीला बोलवून घेईन असे तो सांगतो तर स्मिताला तिच्या आईला भेटायचे आहे. मेघाला तिच्या कुटुंबियांना भेटायची ओढ लागली आहे तर शर्मिष्ठाला तिचे वडील आणि तिची लाडकी मैत्रीण मधुगंधा कुलकर्णी यांना भेटायचे आहे. पुष्करला मुलीला भेटायचे असून बायकोला आलिंगन द्यायचे आहे. सईला देखील पालकांना भेटण्याची तीव्र इच्छा आहे.
बिग बॉस या कार्यक्रमात गेल्यापासून प्रत्येक स्पर्धक जिंकण्यासाठी मेहनत घेत आहे. या कार्यक्रमाचा अंतिम भाग आता काहीच दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या स्पर्धकांच्या फॅन्सनी अधिकाधिक मते देऊन आपल्याला विजेता बनवावे असे प्रत्येक स्पर्धकाला वाटत आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाने पत्रकारांच्या माध्यमातून आजवर न मांडू शकलेल्या अनेक गोष्टी लोकांसमोर मांडल्या.