दसऱ्याच्या शुभदिनी 'बिग बॉस' फेम सूरज चव्हाणचा व्हिडीओ चर्चेत, DP दादाने सांगितलं बायकोचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 13:33 IST2025-10-02T13:32:41+5:302025-10-02T13:33:18+5:30
सूरज चव्हाणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने त्याच्या छकुलीचा चेहरा दाखवला आहे, कोण आहे ती?

दसऱ्याच्या शुभदिनी 'बिग बॉस' फेम सूरज चव्हाणचा व्हिडीओ चर्चेत, DP दादाने सांगितलं बायकोचं नाव
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. सूरजला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. सूरजने काही दिवसांपूर्वी त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल खुलासा केला होता. इतकंच नव्हे सूरजची मैत्रीण अंकिता वालावलकरने सुद्धा सूरजच्या लग्नाचा खुलासा केला होता. अशातच सूरजने आज दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर सूरजने एक व्हिडीओ शेअर केलाय, या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे
सूरजचा नवीन व्हिडीओ चर्चेत
सूरज चव्हाणने एक जुनं हिंदी गाणं शेअर केलं आहे. या गाण्यात सूरज चव्हाणसोबत एक गजरा घातलेली मुलगी दिसत आहे. सूरज या मुलीसोबत रोमँटिक डान्स करताना दिसतोय. 'मैरे सवालो का जवाब दो' असं हे हिंदी गाणं आहे. या व्हिडीओखाली सूरजने, 'टाईमपास वीडियो आहे माझी खरी लवकरचं दावतो', असं कॅप्शन शेअर केलं आहे. सूरजने जरी असं कॅप्शन लिहिलं असलं तरी अनेकांना व्हिडीओ दिसणारी मुलगीच सूरजची बच्चा आहे, असं वाटतंय. इतकंच नव्हे धनंजय पोवार अर्थात DP ने केलेली कमेंटही चर्चेत आहे.
DP दादा लिहितो, ''मला माहित हाय मी बघितलोय, 'थांब आता तुझा फोटो मीच वायरल करणार. थांब तुझ्या छकुलीचा फोटो टाकतो, सूरजच्या होणाऱ्या बायकोचे नाव. छकुली नाव आहे.'' अशी कमेंट DP ने केली आहे. याशिवाय अभिजीत सावंत आणि सूरजच्या अनेक चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहून त्याचं अभिनंदन केलं आहे. आता हीच सूरजची 'बच्चा' आहे का?, याचा खुलासा सूरजकडून होईलच. तोवर त्याचे चाहते त्याच्या प्रत्येक व्हिडीओची अपडेट घेत असतील.