"हात-पाय सुजायचे अन्...",'बिग बॉस'मधील प्रभू शेळकेने सांगितला आजारपणाचा 'तो' अनुभव, म्हणाला-"माझ्या शरीरात…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:14 IST2026-01-24T12:56:45+5:302026-01-24T13:14:08+5:30

"मला हा त्रास ....", 'बिग बॉस'फेम   प्रभू शेळकेनं सांगितला गंभीर आजाराचा अनुभव

bigg boss marathi season 6 fame prabhu shelke talk about her thalassemia disease | "हात-पाय सुजायचे अन्...",'बिग बॉस'मधील प्रभू शेळकेने सांगितला आजारपणाचा 'तो' अनुभव, म्हणाला-"माझ्या शरीरात…"

"हात-पाय सुजायचे अन्...",'बिग बॉस'मधील प्रभू शेळकेने सांगितला आजारपणाचा 'तो' अनुभव, म्हणाला-"माझ्या शरीरात…"

Bigg Boss Marathi 6 Fame Prabhu Shelke: 'बिग बॉस मराठी'चं यंदाचं पर्व मोठ्या दणक्यात सुरु झालं. हा शो सुरु होऊन दोन आठवडे झाले आहेत. या पर्वार अनेक सेलिब्रिटींसह सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सर्स देखील सहभागी झाले आहेत. त्यातील एक नाव म्हणजे जालन्याचा प्रभू शेळके. प्रभू शेळके हा त्याच्या रील्स, व्हिडीओजसाठी प्रसिद्ध आहे. प्रभु शेळके जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड गावचा अत्यंत गरीब घरातील मुलगा आहे. त्याला थॅलेसेमिया हा गंभीर आजार आहे. दर महिन्याला त्याला रक्त बदलून घ्यावे लागते.अशातच एका मुलाखतीत प्रभू शेळकेने त्यांच्या गंभीर आजारपणाबद्दल सांगितलं आहे.

'बिग बॉस मराठी ६'मध्ये जाण्यापूर्वी  प्रभू शेळकेने  'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्याने आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं. तो म्हणाला, "त्यावेळी मी खूप लहान होतो, पाच वर्ष-आठ वर्ष मला झटके आले. त्यानंतर ते झटके बंद झाले. आठ वर्षानंतर आई-वडिलांना कळलं की, माझ्या शरीरात रक्त कमी आहे. मी तीन-चार वर्षांचा असतानाच मला हा त्रास सुरू झालेला. त्यानंतर दोन वर्षानंतर परत  एकदा रक्त चढवावं लागलं. मग पप्पांनी असं, एक दोनदा केलं. त्यावेळी बाबा ऊसतोडीला जायचे. त्या कामातूनच ते ५० हजार वैगरे जमवायचे आणि ते पैसे जे काही यायचे, त्यातून माझा औषधांचा खर्च करायचे. माझे हात पाय सुजायचे. त्यावेळी माझ्या संपूर्ण शरीरावर सूज यायची."

मग पुढे प्रभू म्हणाला, "आठ वर्षानंतर मला हा आजार आहे, हे  कळलं. नंतर मी मुंबईतील जे.जे रुग्णालयात दोन महिने अॅडमिट होतो.सगळे रिपोर्टस केले.  तेव्हा कळालं की हा  आजार आहे. ज्यामुळे माझ्या शरीरातील रक्त कमी होतं. याचा त्रास काही होतं नाही. पण, जेव्हा शरीरारीत रक्त कमी होतं तेव्हा काहीच खायची इच्छा होत नाही. माझ्या शरीरात ताकद राहत नाही. सारखी झोप येते. ज्यावेळेला मी रक्त चढवतो त्यानंतर २ महिने तरी काहीच त्रास होत नाही. "

यावेळी प्रभू असंही म्हणाला,"आता मला मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे.जर मीच हार मानली तर माझे आई-वडील  देखील निराश होतील. त्यांच्याकडे बघूनच मी मनात हिंमत आणतो." असं प्रभूने यावेळी सांगितलं.

Web Title: bigg boss marathi season 6 fame prabhu shelke talk about her thalassemia disease