'बिग बॉस'च्या घरात वर्षा व निक्की झाल्या मालकीन बाई! ऑर्डर ऐकून जान्हवीला आलं रडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 13:12 IST2024-09-25T13:12:19+5:302024-09-25T13:12:45+5:30

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात काय होणार, याची झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळतेय.

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Varsha Usgoankar Suraj Chavan And Dp Powar Win Task | 'बिग बॉस'च्या घरात वर्षा व निक्की झाल्या मालकीन बाई! ऑर्डर ऐकून जान्हवीला आलं रडू

'बिग बॉस'च्या घरात वर्षा व निक्की झाल्या मालकीन बाई! ऑर्डर ऐकून जान्हवीला आलं रडू

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाचा सीझन केवळ 70 दिवसांत संपणार आहे. याची अधिकृत घोषणा नुकतीच 'बिग बॉस'कडून करण्यात आली आहे. आता शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये या खेळात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सीझनमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक बाहेर पडून आता घरात 8 स्पर्धक उरले आहेत. अशातच बिग बॉसच्या घरात मालक आणि सांगकाम्यांचा टास्क रंगला. यामध्ये कोणती टीमने बाजी मारली कोणती टीम हरली हे जाणून घेऊया. 

आजच्या भागात लगोरीचा खेळ रंगणार आहे. यामध्ये  'बिग बॉस'कडून दोन टीम करण्यात आल्या. यात एका टीममध्ये जान्हवी, अंकिता, पॅडी आणि अभिजीत. तर दुसऱ्या टीममध्ये निक्की, सुरज, वर्षा आणि धनंजय अशी विभागणी करण्यात आली. या टास्कमध्ये जिंकणारी टीम ही मालक आणि हरणारी टीममधील सदस्य हे सांगकामे. हा टास्क जिंकण्यासाठी दोन्ही टीमकडून भरपूर मेहनत घेतली गेली. अंकिता आणि वर्षा ताईंमध्ये चांगलीच लढतही झाली. एवढचं काय तर जान्हवीला टास्क खेळताना दुखापतही झाल्याचं प्रोमोत पाहायला मिळालं. 

'बिग बॉस मराठी'च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की, सुरज, वर्षा आणि धनंजय यांची टीम जिंकल्याचं पाहायला मिळतेय. मालक बनल्यानंतर हे सदस्य जान्हवी, अंकिता, पॅडी आणि अभिजीत यांना कामे सांगताना प्रोमोमध्ये पाहायला मिळताय. एवढंच काय तर वर्षा यांनी जान्हवी आणि अंकिताकडून पाय दाबून घेतल्याचंही प्रोमोत दिसलं. 


'बिग बॉस मराठी'च्या घरात आताच्या घडीला अभिजीत, अंकिता, सूरज, जान्हवी, पंढरीनाथ, वर्षा, निक्की आणि धनंजय असे एकूण आठ सदस्य आहेत. फिनाले अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे येत्या आठवड्यात हे सगळे सदस्य नॉमिनेट आहेत.  'बिग बॉस मराठी'चा महाअंतिम सोहळा येत्या 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे. ग्रँड फिनालेमध्ये कोण मानाची ट्रॉफी  उंचावणार याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 
 

Web Title: Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Varsha Usgoankar Suraj Chavan And Dp Powar Win Task