Sangram Chougule : "जे करायचं ते टॉपचं करायचं..."; संग्राम चौगुलेने सांगितला बॉडी बिल्डर बनण्याचा संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 13:10 IST2024-09-11T12:57:08+5:302024-09-11T13:10:58+5:30
Bigg Boss Marathi Season 5 And Sangram Chougule : बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेने बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. घरातील सदस्यांशी संवाद साधताना संग्रामने बॉडी बिल्डर बनण्याच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे.

Sangram Chougule : "जे करायचं ते टॉपचं करायचं..."; संग्राम चौगुलेने सांगितला बॉडी बिल्डर बनण्याचा संघर्ष
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये रोज टोकाचे वाद होताना पाहायला मिळत आहेत. घरातील सदस्यांचं आपापसात असलेलं नातं दिवसागणिक बदलताना दिसतं. आता नव्या सीझनमध्ये पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाली आहे. बॉडी बिल्डर संग्राम चौगुलेने बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. घरातील सदस्यांशी संवाद साधताना संग्रामने बॉडी बिल्डर बनण्याच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे.
अभिजीत सावंत, पंढरीनाथ कांबळे आणि वैभव चव्हाण यांना संग्राम आपल्या बॉडी बिल्डर बनण्याच्या प्रवासाबाबत सांगत आहे. "मी इंजिनिअरिंग सोडून इकडे आलो. मी कॉलेजमध्ये डायरेक्ट जाऊन बोललो. मला हे जमत नाही कारण मला बॉडी बिल्डिंग करायचं आहे. लक चांगलं असेल, टायमिंग चांगलं असेल. कॉलेजचे डायरेक्टर म्हणाले ठीक आहे. पण संग्राम काय कर, तुला जे करायचं आहे ना ते कर पण त्यामध्ये टॉपला गेलं पाहिजे तुला. ती एक लाईन डोक्यात बसली आहे."
"काहीही कर तू पण टॉपचं कर तू, जे करायचं ते टॉपचं करायचं. मला तीन हजार रुपयांची स्पॉन्सरशिपही मिळाली. मला घरातून पाच हजार मिळायचे. अडीच हजार भाड्यासाठी आणि एक हजार मेससाठी. १५०० रुपयांत महिना काढायचो इंजिनिअरिंगचा... मग मी जॉब करायचो" असं संग्रामने म्हटलं आहे. घरात येताच संग्रामने निक्की तांबोळीशी थेट पंगा घेतल्याचं पाहायला मिळालं.
संग्रामच्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळे घरातील समीकरणं पुन्हा बदलल्याचं पाहायला मिळणार आहे. निक्की आणि अरबाजने त्याच्याशी वाद घातला. तर दुसरीकडे घरातील काही सदस्यांना संग्रामचं मत पटत आहे. जान्हवीने संग्रामची स्तुती केली. तसेच गोलीगत धोका फेम सूरज चव्हाणही सध्या संग्राम बरोबर असल्याचं पाहायला मिळत आहे. सूरज सध्या घराचा कॅप्टन आहे. तो संग्रामकडून घरामध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.