तो नाच गाना बनता हैं! 'अफगान जलेबी' गाण्यावर अभिजीत सावंतचा भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 12:31 IST2024-11-09T12:27:12+5:302024-11-09T12:31:16+5:30

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात इंडियन आयडल विजेता अभिजीत सावंत देखील सहभागी झाला होता.

bigg boss marathi season 5 fame abhijeet sawant dance on afghan jalebi song video viral  | तो नाच गाना बनता हैं! 'अफगान जलेबी' गाण्यावर अभिजीत सावंतचा भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले...

तो नाच गाना बनता हैं! 'अफगान जलेबी' गाण्यावर अभिजीत सावंतचा भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले...

Abhijeet Sawant Video: 'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi)च्या पाचव्या पर्वात इंडियन आयडल विजेता अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) देखील सहभागी झाला होता. आपल्या दमदार खेळीने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. या शोमुळे त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. अभिजीत या पर्वाचा उपविजेता ठरला. इंडियन आयडल'च्या पहिल्या शोचा विजेता बनून अभिजीतने इतिहास रचला. त्यानंतर अभिजीत सावंत रातोरात स्टार झाला. आता बिग बॉस मराठीमुळे तो प्रसिद्धीझोतात झाला आहे. त्यामुळे त्याच्याबाबतीत जाणून घेण्यास प्रेक्षक कायम उत्सुक असतात. नुकताच अभिजीत सावंतने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


सोशल मीडियावर अभिजीत सावंत कमालीचा सक्रीय असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्यबाबत तो याद्वारे चाहत्यांना अपडेट्स देतो. अशातच इन्स्टाग्रामवर नुकताच त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीत 'अफगाण जलेबी' गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतोय. लक्षवेधी गोष्ट म्हणजे त्याने हा व्हिडीओ बाथरुममध्ये शूट केल्याचा पाहायला मिळतोय. डोळ्यांना गॉगल, काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये अभिजीतचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतो. 

"शोआधी अतिउत्साह आणि बाथरुममध्ये चांगल्या लाईट्स असल्या की नाच गाणं तर व्हायलाच हवं", असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. अभिजीतचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओवर अभिजीतच्या चाहतीने कमेंट करत लिहलंय, अभिलाषा मोड ऑन! खूपच छान आम्ही मिस करत होतो". तर आणखी एका यूजरने, भाई वाह, भाई वाह! असं म्हणत त्याचं कौतुक केलंय. 

Web Title: bigg boss marathi season 5 fame abhijeet sawant dance on afghan jalebi song video viral