'बिग बॉस मराठी' फेम अक्षय केळकरची लगीनघाई; मेहंदी सोहळ्याचा पहिला फोटो आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:00 IST2025-05-06T14:59:18+5:302025-05-06T15:00:39+5:30
सध्या मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत.

'बिग बॉस मराठी' फेम अक्षय केळकरची लगीनघाई; मेहंदी सोहळ्याचा पहिला फोटो आला समोर
Akshay Kelkar Mehandi: सध्या मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अलिकडच्या काही दिवसांमध्ये बऱ्याच कलाकारांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. आता या पाठोपाठ आणखी एक मराठी अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे. हा अभिनेता म्हणजे अक्षय केळकर (Akshay Kelkar) आहे. बिग बॉस मराठीच्या चौथा पर्वाचा विजेता असलेला अभिनेता अक्षय केळकरच्या घरी आता लगीनघाई सुरु झाली आहे. नुकताच अक्षय केळकरच्या मेहंदी सोहळ्याचा पहिला फोटो समोर आला आहे.
सध्या अभिनेता अक्षय केळकरच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाल्याचं पाहाया मिळतंय. नुकतेच सोशल मीडियावर अभिनेत्याने त्याच्या मेहंदी सोहळाचे काही क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. "मेहंदी इन प्रोसेस...", असं कॅप्शन देत अक्षयने त्याच्या रमासोबतचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत अभिनेता बोहल्यालवर चढणार हे स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, अलिकडेच अक्षय आणि साधना मे महिन्यात लग्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. याबद्दल त्याने खास सोशल मीडिया पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. "मे २०२५ ठरलं, आता ना फिरणे माघारी, वाजवा हो तुतारी, करा ही तयारी… तरीही मुलींनो, आय लव्ह यु… मी फक्त तुमचाच आहे" असं म्हणत त्याने लग्नाची तारीख सांगितली होती. त्यामुळे आता अभिनेत्याच्या लग्नाबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
वर्कफ्रंट
अक्षय केळकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच तो 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या आला आहे. या चित्रपटात त्याने संत निवृत्तीनाथांची भूमिका साकारली आहे. तसेच अनेक मालिका तसेच रिअॅलिटी शओमध्ये झळकला आहे. त्याने 'कलर्स मराठी' वाहिनीवर 'अबीर गुलाल' या मालिकेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाला.