भर पावसात मीराने केलं बोल्ड फोटोशूट; अभिनेत्रीच्या किलर पोझमुळे नेटकरी घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 14:25 IST2022-08-08T14:24:40+5:302022-08-08T14:25:45+5:30
Mira jagganath: बिग बॉससह काही गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेल्या मीराने पावसात भिजतानाचा एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे.

भर पावसात मीराने केलं बोल्ड फोटोशूट; अभिनेत्रीच्या किलर पोझमुळे नेटकरी घायाळ
बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मीरा जगन्नाथ. या शोमध्ये मीरा टास्क खेळण्याच्या पद्धतीसोबतच तिच्या नवनवीन वादविवादांमुळेही चर्चेत राहिली. त्यामुळे बिग बॉसचं तिसरं पर्व तिने गाजवलं. बिग बॉससह काही गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेली मीरा सोशल मीडियावर सक्रीय असून कायम तिच्याविषयीचे अपडेट देत असते. यावेळी मीराने पावसात भिजतानाचा एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे.
मीराने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ब्लँक अँड व्हाइटमध्ये असलेल्या या व्हिडीओमध्ये मीरा कमालीची सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती पावसात चिंब भिजली असून तिने लक्ष वेधणाऱ्या पोझ फोटोसाठी दिल्या आहेत.
दरम्यान, मीरा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बिग बॉस, येऊ कशी तशी मी नांदायला यांसारख्या मालिका, कार्यक्रमांमध्ये ती झळकली आहे.