सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' मधील 'हा' अभिनेता लग्नबंधनात अडकणार! साखरपुडा संपन्न; सर्वत्र होतोय शुभेच्छांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 11:58 IST2025-12-23T11:56:38+5:302025-12-23T11:58:23+5:30
'बिग बॉस' फेम लोकप्रिय अभिनेता लवकरच बोहोल्यावर चढणार! थाटामाटात पार पडला साखरपुडा, सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' मधील 'हा' अभिनेता लग्नबंधनात अडकणार! साखरपुडा संपन्न; सर्वत्र होतोय शुभेच्छांचा वर्षाव
Jay Dudhane: गेल्या दोन-तीन महिन्यांत बहुतांश मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली. प्राजक्ता गायकवाड-शंभुराज खुटवड, कोमल कुंभार-गोकुळ दशवंत तसेच पूजा बिरारी- सोहम बांदेकर या कलाकारांनंतर आणखी एक अभिनेता लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. त्यामुळे सध्या मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींसह, अभिनेत्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला अभिनेता जय दुधाणे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. सध्या जय दुधाणेच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली आहे. नुकताच थाटामाटात साखरपुडा उरकत अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी आहे.जय दुधाणेच्या साखरपुड्याला त्याच्या कुटुंबियांसह मित्र-मंडळी देखील उपस्थित होते. त्याच्या मित्र-मैत्रींणींनी त्याच्या साखरपुड्यातील Inside फोटो शेअर करत अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याने व त्याच्या होणाऱ्या पत्नीने साखरपुड्यात सुंदर लूक केल्याचं व्हायरल फोटोजमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय एका फोटोमध्ये जय त्याच्या होणाऱ्या पत्नीला गुडघ्यावर बसून प्रपोज करत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच जय दुधानेचं केळवण साजरं करण्यात आलं होतं. आता लवकरच जय-हर्षला लग्नबंधनात अडकणार आहेत.
जयच्या होणाऱ्या पत्नीचं नाव हर्षला पाटील आहे. हर्षला पाटील ही लोकप्रिय सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सर आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणूनही ओळखली जाते. गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकाना डेट करत आहेत. तर जय दुधाणे 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये तो चर्चेतील चेहरा होता. 'बिग बॉस मराठी ३'चा तो उपविजेता होता. तर 'MTV स्प्लिट्सविला १३'चा जय विनर होता. त्यानंतर जय 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतही दिसला होता.