बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी आहे ही खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 12:46 IST2019-03-18T12:38:36+5:302019-03-18T12:46:43+5:30

‘बिग बॉस मराठी’ या शोच्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे.

bigg boss marathi season 2 will start soon | बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी आहे ही खुशखबर

बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी आहे ही खुशखबर

ठळक मुद्देया कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाची टीम जोरदार कामाला लागली आहे.

वाद, विरोध, प्रेम, मैत्री अशा वेगवेगळ्या अंगाने रंगलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोच्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या कार्यक्रमाची टीम जोरदार कामाला लागली आहे.

बिग बॉस या कार्यक्रमाच्या आजवरच्या सगळ्याच सिझनला प्रेक्षकांचे खूपच चांगले प्रेम मिळाले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान खान करतो. याच कार्यक्रमाच्या धर्तीवर आपल्याला बिग बॉस मराठी पाहायला मिळाला होता. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनच्या अंतिम फेरीत मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर या स्पर्धकांनी मजल मारली होती. प्रेक्षकांच्या मतांमुळे प्रेक्षकांची लाडकी मेघा धाडे या कार्यक्रमाची विजेती ठरली होती. पहिल्या आठवड्यापासूनच मेघा ही ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानली जात होती. किंबहुना शो जिंकायचाच याच महत्त्वाकांक्षेने मेघा या घरात आली होती. सुरुवातीपासूनच या दूरदृष्टीने मेघाचा खेळ सुरू होता. ‘बिग बॉस’च्या १०० दिवसांच्या वास्तव्यात मेघावर अनेक आरोप झालेत. ती बडबडी आहे, ती खोटारडी आहे, ती अप्रामाणिक आहे, असे अनेक आरोप तिने झेलले. ज्या सई आणि पुष्कर या ‘बिग बॉस’च्या घरातील तिच्या सर्वाधिक जवळच्या मित्रांनीही तिच्यावर हे आरोप केले होते. पण मेघा या आरोपांना पुरून उरली. मेघा, तू ‘बिग बॉस’च्या घरात जान आणलीस, हे महेश मांजरेकर यांचे शब्द तिने अक्षरश: खरे ठरवले होते. 

बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. आता दुसऱ्या सिझनमध्ये देखील तेच या कार्यक्रमाची धुरा सांभाळणार का? तसेच या दुसऱ्या सिझनमध्ये मराठीतील कोणकोणते सेलिब्रेटी बिग बॉसच्या घरात आपल्याला पाहायला मिळणार? याबाबत अद्याप तरी कार्यक्रमाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे. या कार्यक्रमात आता कोण कोण हजेरी लावणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

 

Web Title: bigg boss marathi season 2 will start soon