"तू जेंटलमन आहेस", रुपाली भोसलेचा राकेश बापटला पाठिंबा, अनुश्री मानेला सुनावलं, म्हणाली- "दुसरं कोणी असतं तर त्याने..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 10:24 IST2026-01-22T10:24:18+5:302026-01-22T10:24:44+5:30
सेलिब्रिटींनीही राकेशला पाठिंबा देत अनुश्री आणि रुचिताला सुनावलं आहे. आता अभिनेत्री रुपाली भोसलेनेदेखील या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केला होता.

"तू जेंटलमन आहेस", रुपाली भोसलेचा राकेश बापटला पाठिंबा, अनुश्री मानेला सुनावलं, म्हणाली- "दुसरं कोणी असतं तर त्याने..."
Bigg Boss marathi 6: बिग बॉस मराठी ६ या पर्वाचा दुसरा आठवडा सुरू आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. राकेशने अनुश्रीचा हात धरत तिला त्याच्या बेडवरुन उठवल्याने त्यांच्यात भांडण झालं. अनुश्रीने राकेशवर गंभीर आरोप केले. तर रुचिता जामदारनेही राकेशने चुकीच्या पद्धतीने वागल्याचं म्हणत परवानगी न घेता अनुश्रीला हात लावल्याचं म्हटलं. त्यामुळे राकेशचाही पारा चढला होता. आणि संपूर्ण घराचं वातावरण तापलं होतं. सागर कारंडेनेही राकेशची बाजू घेत अनुश्रीला झापलं होतं. अनेक सेलिब्रिटींनीही राकेशला पाठिंबा देत अनुश्री आणि रुचिताला सुनावलं आहे. आता अभिनेत्री रुपाली भोसलेनेदेखील या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केला होता.
रुपाली भोसलेने राकेशला पाठिंबा देत त्याची साथ दिल्याबद्दल सागर कारंडेचंही कौतुक केलं आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत तिने अनुश्री आणि रुचिताला खडे बोल सुनावले आहेत. रुपालीने पोस्टमध्ये म्हटलंय की "सिरियसली परत एकदा विचारतेय कोण आहेत कोण या मुली? राकेश बापट तू इतका त्रास करून घेऊ नकोस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. तू खरंच जेंटलमन आहेस. दुसरं कोणी असतं तर राडा केला असता... पण तू खूप चांगल्या पद्धतीने सगळं हँडल केलंस. सागर कारंडे तू कमाल आहेस आणि तसंच तू दिसतोस. तू ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणात राकेशसोबत उभा आहेस आणि ती परिस्थिती ज्याप्रकारे हाताळलीस त्यासाठी रिस्पेक्ट मित्रा...".

अनुश्रीने असे आरोप केल्यानंतर राकेशला प्रचंड वाईट वाटलं होतं. मात्र घरातल्यांनी त्याला समजावलं. राकेशवर आरोप केल्यानंतर रुचिताने "मी कोणाचं कॅरेक्टर काढलं नाही", असं ती म्हणाली. त्यानंतर टास्कमध्येही राकेश आणि अनुश्रीमध्ये बाचाबाची झाल्याचं दिसलं. आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख या संपूर्ण प्रकरणावरुन रुचिता आणि अनुश्रीची कानउघाडणी करणार का? हे पाहावं लागेल.