Bigg Boss Marathi:या गोष्टींमुळे रंगली अंतिम फेरीची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 14:02 IST2018-07-20T13:58:03+5:302018-07-20T14:02:14+5:30
मेघा – सई आणि पुष्कर यांना त्यांची मैत्री... सकाळचा डान्स, एकत्र टास्क करणे, स्वयंपाक बनवणे, भांडण, वाद हे सगळ या तिघांबरोबरच आस्ताद, स्मिता आणि शर्मिष्ठाला देखील आठवणार आहे. सहा जणांनी घरामध्ये आलेल्या अनेक अडचणीना मात करून आता ग्रँड फिनालेमध्ये पोहचले आहेत.

Bigg Boss Marathi:या गोष्टींमुळे रंगली अंतिम फेरीची चर्चा
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सकाळपासून सदस्यांमध्ये अंतिम फेरीबद्दलची चर्चा रंगणार आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सकाळी सगळे खूप भाऊक झालेले दिसणार आहेत. कारण बिग बॉस यांनी लावलेले गाणे. सगळ्यांना घरामधील आजवरचे टास्क, भांडण, गप्पा सगळे आठवणार आहे. मेघाचं पहिल्या दिवसापासूनच किचनवरच प्रेम आणि तिला अनावर झालेले अश्रू. हे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे... मेघा – सई आणि पुष्कर यांना त्यांची मैत्री... सकाळचा डान्स, एकत्र टास्क करणे, स्वयंपाक बनवणे, भांडण, वाद हे सगळ या तिघांबरोबरच आस्ताद, स्मिता आणि शर्मिष्ठाला देखील आठवणार आहे. सहा जणांनी घरामध्ये आलेल्या अनेक अडचणीना मात करून आता ग्रँड फिनालेमध्ये पोहचले आहेत.
आज बिग बॉस सगळ्या सदस्यांना त्यांच्या घरातील प्रवासाची झलक दाखवणार आहेत. पुष्कर यांनी आपल्या सिनेमामध्ये सुपरहिरोचे काम केले पण तो खऱ्या आयुष्यामध्ये देखील सुपरहिरो आहे हे त्याने त्याच्या बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवासाने सिद्ध केले. प्रत्येकवेळी पुष्कर त्याने त्याचा सर्वोत्तम खेळ खेळला. पण तरीही कॅप्टनसीने तीनवेळा हुलकावणी दिली.पण तरीही तो कधीही न खचला नाही आणि त्याने त्याचा खेळ सुरु ठेवला. मित्रांना, मोठ्यांना, स्त्रियांना आदर दिला, तसेच या घरामधील पुष्करच्या प्रवासातील काही महत्वाच्या गोष्टी देखील त्याच्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तसेच सईला देखील बिग बॉस मराठीच्या घरातील तिचा प्रवास दाखविण्यात येणार आहे. घरातील मैत्री, अडचणी, मेघा – तिचे नाते, सदस्यांनी तिच्यावर केलेले आरोप. हे सगळ बघून दोघे भाऊक होणार यात शंका नाही. बिग बॉस यांनी दिलेल्या या खास सरप्राईझ मुळे घरातील सदस्य खूप खुश असून त्यांना आता बिग बॉस जिंकल्यासारखेच वाटत आहे असे ते बिग बॉस यांना सांगणार आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरात नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.शर्मिष्ठा राऊत, सई लोकूर, पुष्कर जोग, मेघा घाडे, अस्ताद काळे आणि स्मिता गोंदकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना भरभरून उत्तरे दिली. या पत्रकार परिषदेच्या दरम्यान सईला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तरावर सगळ्यांना हसू आले. सईला विचारण्यात आले होते की, पुष्कर आणि तुझी केमिस्ट्री खूप चांगली आहे. तुम्ही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहात. जर पुष्करचे लग्न झाले नसले तर त्याचा तू विचार केला असतास का? यावर हसत उत्तर देत सई म्हणाली, मी अनेकवेळा मस्करीत बोलते की, माझी बस सुटलेली आहे. हा पण पुष्करचे लग्न झाले नसते तर मी ही बस नक्कीच पकडली असती.पुष्करला देखील हाच प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पुष्कर सांगतो, माझे लग्न झाले असून मला एक गोड मुलगी आहे.मी माझ्या संसारात खूपच खूश आहे. पण माझे लग्न झाले नसते तर मी नक्कीच सईचा विचार केला असता.बिग बॉस या रिअॅलिटी शोची सध्या चांगलीच चर्चा आहे. अस्ताद काळे आणि पुष्कर जोगने या कार्यक्रमाच्या फायनल पर्यंत धडक मारली आहे. आता या कार्यक्रमाचा विजेता कोण होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.