आधी भांडले मग लगेच एकत्रही आले! निक्कीने अरबाजला सगळ्यांसमोर काढायला लावल्या उठाबशा, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 16:13 IST2024-09-20T15:21:11+5:302024-09-20T16:13:17+5:30

कॅप्टन्सी टास्कचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये निक्कीने अरबाजला उठाबशाही काढायला लावल्याचं दिसत आहे.

bigg boss marathi nikki tamboli and arbaaz khan patch up after fight video | आधी भांडले मग लगेच एकत्रही आले! निक्कीने अरबाजला सगळ्यांसमोर काढायला लावल्या उठाबशा, व्हिडिओ व्हायरल

आधी भांडले मग लगेच एकत्रही आले! निक्कीने अरबाजला सगळ्यांसमोर काढायला लावल्या उठाबशा, व्हिडिओ व्हायरल

Bigg Boss Marathi Season 5 : यंदाच्या आठवड्यातील कॅप्टन्सी पदासाठी बिग बॉस मराठीच्या घरात टास्क रंगला आहे. घराचा कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. कॅप्टन्सी टास्कमधून सदस्यांना बाद करण्यासाठी टीम A आणि टीम B मध्ये टास्क रंगला होता. अंड्याचा फंडा टास्कमध्ये दुसऱ्या स्पर्धकाच्या घरट्यात अंड ठेवून त्या सदस्याला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाद करायचं होतं. या टास्कमध्ये टीम B मधील अभिजीत, अंकिता, जान्हवी, पॅडी आणि संग्राम हे सदस्य बाद झाले. तर अरबाज, वर्षा, सूरज आणि धनंजय यांच्यात कॅप्टन्सीसाठी शर्यत रंगलेली पाहायला मिळणार आहे. 

कॅप्टन्सी टास्कचा व्हिडिओ समोर आला आहे. या टास्कमध्ये कॅप्टन्सीच्या शर्यतीत असलेल्या सदस्यांकडे पाण्याचे जार देण्यात आल्याचं दिसत आहे. या सदस्यांना घरातील इतर सदस्यांना त्यांचं मत पटवून द्यायचं आहे. या आधीच्या टास्कमध्ये अरबाज आणि निक्कीमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळत होतं. पण, आता या टास्कमध्ये मात्र त्यांची वेगळीच स्ट्रॅटेजी पाहायला मिळत आहे. कॅप्टन म्हणून मी योग्य आहे हे अरबाज निक्कीला पटवून देत असताना निक्की त्याला टोमणे मारत असल्याचं दिसलं. त्यानंतर निक्कीने सगळ्यांसमोरच अरबाजला उठाबश्या काढायला लावल्या.  "आता तू रुसणार का माझ्यावर?" असंही निक्की नंतर अरबाजला म्हणते. त्यानंतर तिने अरबाज तिला "कधीच नाही" असंही म्हणत असल्याचं दिसत आहे. 


आता या टास्कमध्ये कोण बाजी मारून घराचा कॅप्टन होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात वैभव चव्हाणचा घरातील प्रवास संपला. तर निक्कीच्या कानाखाली मारल्याने आर्याला घरातून एक्झिट घ्यावी लागली. या आठवड्यात निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षाताई आणि सूरज हे सदस्य थेट नॉमिनेट झाले आहेत. आता यातील कोणाचा प्रवास संपतो, हे पाहावं लागेल. 
 

Web Title: bigg boss marathi nikki tamboli and arbaaz khan patch up after fight video