जय-विकासमध्ये तुंबळ हाणामारी?; 'मिशन नॉमिनेशन'साठी घरात राडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 19:52 IST2021-11-15T19:52:08+5:302021-11-15T19:52:35+5:30
Bigg boss marathi: या दोघांच्या शाब्दिक वादाचं रुपांतर मारामारीपर्यंत येतं की काय असं या व्हिडीओमध्ये पाहिल्यावर वाटत आहे.

जय-विकासमध्ये तुंबळ हाणामारी?; 'मिशन नॉमिनेशन'साठी घरात राडे
बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi)घरात आता प्रत्येक आठवड्याला नवनवीन टास्क रंगत आहेत. मात्र, आता दिवसेंदिवस हे टास्क अवघड होत असून यामुळे घरातील स्पर्धकांमध्ये प्रचंड मतभेद आणि मनभेद होताना दिसत आहेत. यामध्येच या आठवड्यात रंगणाऱ्या मिशन नॉमिनेशन टास्कमध्ये जय आणि विकासमध्ये मारामारी होताना दिसणार आहे.
कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये विकास आणि जयमध्ये भांडण होतांना दिसत आहे. इतकंच नाही. तर, या दोघांच्या शाब्दिक वादाचं रुपांतर मारामारीपर्यंत येतं की काय? असं या व्हिडीओमध्ये पाहिल्यावर वाटत आहे.
मिशन नॉमिनेशन टास्कमध्ये जय संचालक आहे. मात्र, संचालक असूनही जय दुसऱ्या टीमला सपोर्ट करतो असं म्हणत विकासने जयशी वाद घातला. ज्यामुळे संतापलेल्या जयने घरात राडा घातला आहे.
"सोडायचं नाही डॉक्टर त्याला...", असं जय उत्कर्षला म्हणतो. त्यावर"तू संचालक आहेस ना ? मग संचालकाच काम कर... प्लेयरला सपोर्ट... त्याला पाठवतो मारायला...," असं विकास जयला म्हणतो.
दरम्यान, या दोघामधील वाद आता विकोपाला गेला आहे. त्यामुळे आज बिग बॉसच्या घरात नेमकं काय होणार? या दोघांमधील वाद कोणतं स्वरुप धारण करेल? की हा वाद इथेच थांबेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.