अखेर आनंदाचा दिवस उजाडला! 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणचा साखरपुडा, व्हिडिओ शेअर केला पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 10:42 IST2025-06-01T10:41:28+5:302025-06-01T10:42:09+5:30

सूरजने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. सूरजला त्याच्या स्वप्नातली अप्सरा मिळाली आहे.

bigg boss marathi fame suraj chavan shared his engagement video | अखेर आनंदाचा दिवस उजाडला! 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणचा साखरपुडा, व्हिडिओ शेअर केला पण...

अखेर आनंदाचा दिवस उजाडला! 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणचा साखरपुडा, व्हिडिओ शेअर केला पण...

'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणचा चाहता वर्ग मोठा आहे. बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्या वर्गात वाढ झाली. सूरजने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. सूरजला त्याच्या स्वप्नातली अप्सरा मिळाली आहे. एक व्हिडिओ सूरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्याने अप्सरेची झलक दाखवली आहे. 

सूरज मुलगी पाहायला गेल्याचं व्हिडिओत दिसत आहे. सूट बूट घालून सूरज कुटुंबीयांसह मुलीच्या घरी जातो. बघताच क्षणी दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघांचा साखरपुडाही होतो. "अखेर आनंदाचा दिवस उजाडला", असं म्हणत सूरजने हा व्हिडिओ शेअर केला आहे. सूरजचा साखरपुडा झाल्यामुळे चाहते आनंदी होते. कमेंट बॉक्समध्ये ते सूरजचं अभिनंदन करणार होते. मात्र, त्याआधीच त्यांना मोठा धक्का बसला. 


खरं तर सूरजचा साखरपुडा झालेला नाही. व्हिडिओची सुरुवात पाहून सगळ्यांना असंच वाटलं होतं. मात्र नंतर सूरज स्वप्न बघत असल्याचं व्हिडिओत दिसलं. त्यामुळे सूरजसोबतच चाहत्यांचाही भ्रमनिरास झाला. सूरजच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, सूरजने 'बिग बॉस मराठी ५' मधून सगळ्यांची मनं जिंकली. या पर्वाचा तो विजेता ठरला. 'बिग बॉस मराठी' जिंकल्यावर सूरजचा 'झापुक झुपूक' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. केदार शिंदेंनी याचं दिग्दर्शन केलं होतं. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. 
 

Web Title: bigg boss marathi fame suraj chavan shared his engagement video