"मला अल्लू अर्जुनसोबत साऊथ सिनेमा करायचाय", सूरज चव्हाण म्हणाला- "सयाजी शिंदेंशी ओळख झाली की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:26 IST2026-03-24T12:26:32+5:302026-03-24T12:26:57+5:30

सूरजने साऊथ सिनेमात काम करायची इच्छा व्यक्त केली आहे. सूरज चव्हाणने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं आहे. 

bigg boss marathi fame suraj chavan said i want to work with allu arjun in south movie | "मला अल्लू अर्जुनसोबत साऊथ सिनेमा करायचाय", सूरज चव्हाण म्हणाला- "सयाजी शिंदेंशी ओळख झाली की..."

"मला अल्लू अर्जुनसोबत साऊथ सिनेमा करायचाय", सूरज चव्हाण म्हणाला- "सयाजी शिंदेंशी ओळख झाली की..."

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रीलस्टार असलेल्या सूरज चव्हाणचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. बिग बॉस मराठी ५चा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाण प्रसिद्धीझोतात आला होता. त्यानंतर सूरज 'झापुक झुपूक' या सिनेमातही दिसला होता. या सिनेमात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. आता सूरजने साऊथ सिनेमात काम करायची इच्छा व्यक्त केली आहे. सूरज चव्हाणने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं आहे. 

सूरजने नुकतीच हॉट सीट टॉक्स या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने साऊथमध्ये अल्लू अर्जुनसोबचत काम करण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली आहे. सूरज म्हणाला, "मला साऊथमध्ये काम करायचंय. एकदा तरी मला साऊथमध्ये जायचंय. मला साऊथ सिनेमा करायचा आहे. माझी खूप इच्छा आहे. मी एकदा तरी साऊथमध्ये जाणार. डायरेक्ट टॉपचं काम करणार. माझी ही एवढी एकच अपेक्षा आहे. मला फाईट खूप आवडते. कोणीतरी मला जंगली म्हटलं होतं. सूरज चव्हाण वादळ आहे. घुसलं की सोडत नसतं". 


"मला साऊथमध्ये अल्लू अर्जुनसोबत काम करायचं आहे. त्याचे सिनेमे वेगळे असतात. जे करतो ते हिटच झालं पाहिजे. अल्लू अर्जुनचं पण तसंच आहे. तो एकच करतो पण काम भारी करतो. माझं पण एकच असतं की टॉपचं असतं. आई मरीमाय माताची इच्छा असेल तर मी नक्की जाईन. माझा लूकच तसा साऊथसारखा आहे. साऊथमध्ये काळे सावळे लोक जास्त फेमस होतात. मला सयाजी शिंदेंचा नंबर मिळाला. त्यांच्याशी माझी ओळख झाली की मी साऊथमध्ये गेलोच म्हणून समजा", असंही सूरज चव्हाणने पुढे सांगितलं.

Web Title : सूरज चव्हाण अल्लू अर्जुन के साथ साउथ सिनेमा में काम करने के इच्छुक।

Web Summary : बिग बॉस मराठी 5 के विजेता सूरज चव्हाण साउथ इंडियन सिनेमा में, खासकर अल्लू अर्जुन के साथ काम करना चाहते हैं। उनका मानना है कि उनका लुक साउथ फिल्मों के लिए उपयुक्त है और वे सयाजी शिंदे से जुड़कर अपने सपने को साकार करने की उम्मीद करते हैं।

Web Title : Suraj Chavan desires to work with Allu Arjun in South films.

Web Summary : Bigg Boss Marathi 5 winner Suraj Chavan wants to work in South Indian cinema, especially with Allu Arjun. He believes his look suits South films and hopes to connect with Sayaji Shinde to make his dream a reality.