'बिग बॉस मराठी'मधील स्पर्धकाने घेतली नवी कोरी महिंद्रा थार; गर्लफ्रेंडसोबत आला होता शोमध्ये, नंतर झालं ब्रेकअप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 11:24 IST2026-02-02T11:23:23+5:302026-02-02T11:24:53+5:30
'बिग बॉस मराठी ४' मुळेच डॉक्टर असलेल्या रोहित शिंदेलाही लोकप्रियता मिळाली. रोहित या शोमध्ये गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रुचिरा जाधव हिच्यासोबत सहभागी झाला होता. रोहितने नुकतीच नवी कोरी गाडी खरेदी केली आहे.

'बिग बॉस मराठी'मधील स्पर्धकाने घेतली नवी कोरी महिंद्रा थार; गर्लफ्रेंडसोबत आला होता शोमध्ये, नंतर झालं ब्रेकअप
'बिग बॉस मराठी' हा टीव्हीवरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा रिएलिटी शो आहे. या शोमुळे अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळाली आहे. 'बिग बॉस मराठी ४' मुळेच डॉक्टर असलेल्या रोहित शिंदेलाही लोकप्रियता मिळाली. रोहित या शोमध्ये गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रुचिरा जाधव हिच्यासोबत सहभागी झाला होता. रोहित सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. रोहितने नुकतीच नवी कोरी गाडी खरेदी केली आहे.
रोहितने महिंद्रा कंपनीची थार ही गाडी खरेदी केली आहे. याची झलक त्याने व्हिडीओतून चाहत्यांना दाखवली आहे. रोहितने खरेदी केलेल्या या गाडीची किंमत तब्बल ११ ते २० लाखांच्या घरात आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रोहित हा पेशाने डॉक्टर असून त्याने BAMS ही पदवी घेतली आहे. अनेक ब्युटी आणि फिटनेस पेजेंट त्याने नावावर केले आहेत.
'बिग बॉस मराठी'मध्ये रोहित त्याची गर्लफ्रेंड रुचिरासोबत आला होता. तेव्हा ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र बिग बॉसच्या घरात त्यांच्या नात्यात खटके उडू लागले होते. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर रोहित आणि रुचिराचं ब्रेकअप झालं. आता ते एकत्र नाहीत. रोहितची गर्लफ्रेंड रुचिराने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.