'बिग बॉस मराठी' फेम प्रसाद जवादेची नवी मालिका; साकारणार दमदार भूमिका, प्रोमोमध्ये दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 17:25 IST2024-01-12T17:25:08+5:302024-01-12T17:25:58+5:30

झी मराठीवरील नव्या मालिकेत प्रसादची वर्णी, दमदार भूमिकेची दिसली झलक

bigg boss marathi fame prasad jawade new serial to play important role in paru zee marathi | 'बिग बॉस मराठी' फेम प्रसाद जवादेची नवी मालिका; साकारणार दमदार भूमिका, प्रोमोमध्ये दिसली झलक

'बिग बॉस मराठी' फेम प्रसाद जवादेची नवी मालिका; साकारणार दमदार भूमिका, प्रोमोमध्ये दिसली झलक

'बिग बॉस मराठी'चं चौथ पर्व गाजवलेला अभिनेता प्रसाद जवादे नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसादची झी वाहिनीवरील नव्या मालिकेत वर्णी लागली आहे. या मालिकेतून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रसादच्या या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. यामध्ये त्याची झलक पाहायला मिळत आहे. 

झी मराठीवर एक नवी मालिका लवकरच सुरू होणार आहे. 'पारू' असं या मालिकेचं नाव असून याचा दमदार प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेत अभिनेत्री मुग्धा कर्णिक मुख्य भूमिकेत आहे. अहिल्यादेवी ही भूमिका साकारताना मुग्धा दिसणार आहे. तर प्रसाद मुग्धाच्या मुलाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत प्रसाद एका कर्तबगार मुलाच्या भूमिकेत आहे. 'पारू' मालिकेचा प्रोमो पाहून या मालिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. 

प्रसादने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'अरुंधती', 'कुलस्वामिनी', 'असे हे कन्यादान' या मालिकांमध्ये तो झळकला होता. कलर्स वाहिनीवरील 'काव्यांजली' मालिकेतही प्रसाद मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर सन मराठीवरील 'सावली होईन सुखाची' मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'बिग बॉस मराठी'मुळे प्रसादच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.  प्रसादने नुकतंच अभिनेत्री अमृता देशमुखबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.  

Web Title: bigg boss marathi fame prasad jawade new serial to play important role in paru zee marathi