प्राजक्ता माळीनंतर भाजपाच्या प्रचार रॅलीत दिसली 'ही' मराठी अभिनेत्री, म्हणते -"अबकी बार ४०० पार..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 01:24 PM2024-04-29T13:24:35+5:302024-04-29T13:24:55+5:30

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नितीन गडकरींचा प्रचार करताना दिसली होती. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने भाजपाच्या प्रचारसभेत सहभाग घेतल्याचं दिसत आहे.

bigg boss marathi fame megha dhade in sudhir mungantiwar bjp prachar rally video | प्राजक्ता माळीनंतर भाजपाच्या प्रचार रॅलीत दिसली 'ही' मराठी अभिनेत्री, म्हणते -"अबकी बार ४०० पार..."

प्राजक्ता माळीनंतर भाजपाच्या प्रचार रॅलीत दिसली 'ही' मराठी अभिनेत्री, म्हणते -"अबकी बार ४०० पार..."

देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. दोन टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारासाठी प्रचारसभा घेतल्या जात आहेत. अनेकदा सेलिब्रिटीही या प्रचार सभांमध्ये दिसतात. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नितीन गडकरींचा प्रचार करताना दिसली होती. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने भाजपाच्या प्रचारसभेत सहभाग घेतल्याचं दिसत आहे. 

बिग बॉस मराठी फेम मेघा धाडेभाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारसभेत दिसली. सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचार रॅलीत ती सहभागी झाली होती. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत मेघा भाजपाचा प्रचार करताना दिसत आहे. तिच्याबरोबर अभिनेता अभिजीत केळकरदेखील या प्रचार रॅलीत सहभागी झाला होता.  हा व्हिडिओ शेअर करत मेघा म्हणते, "अबकी बार चारसो पार! फिर एक बार मोदी सरकार!जय हिंद जय भारत जय जवान जय किसान". 

मेघाने गेल्यावर्षी भाजपात प्रवेश करत तिच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. भाजपा प्रवेशनंतर काहीच दिवसात मेघाची भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली होती. भाजपाच्या अनेक कार्यक्रमांना मेघा उपस्थित असते. 
 

Web Title: bigg boss marathi fame megha dhade in sudhir mungantiwar bjp prachar rally video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.