'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 09:26 IST2025-12-25T09:25:57+5:302025-12-25T09:26:18+5:30
FA9LA या गाण्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. लग्नांमध्येही डिजेवर हे गाणं वाजताना दिसतं. मराठी अभिनेत्याने चक्क त्याच्या लग्नात FA9LA गाण्यावर डान्स करत सगळ्यांनाच थक्क केलं.

'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
'धुरंधर' मधली सगळीच गाणी हिट ठरत आहेत. या सिनेमातील FA9LA गाण्याने अक्षरश: चाहत्यांना वेड लावलं आहे. अक्षय खन्नाच्या एन्ट्रीचं हे गाणं तुफान व्हायरल झालं आहे. FA9LA या गाण्यावरील रील्सही व्हायरल होत आहेत. सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि सेलिब्रिटींनाही या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही. एका मराठी अभिनेत्याने तर त्याच्या लग्नातच FA9LA या गाण्यावर डान्स केला आहे.
FA9LA या गाण्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. लग्नांमध्येही डिजेवर हे गाणं वाजताना दिसतं. मराठी अभिनेत्याने चक्क त्याच्या लग्नात FA9LA गाण्यावर डान्स करत सगळ्यांनाच थक्क केलं. बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. जय दुधाणेच्या संगीत सोहळ्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जय दुधाणे FA9LA गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याचा स्वॅग पाहून सगळे त्याच्याकडे बघतच राहिले.
जय दुधाणेने गर्लफ्रेंड हर्षला पाटीलसोबत लग्न केलं आहे. सोशल मीडियावरुन त्याने प्रेमाची कबुली दिली होती. जयने काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. बिग बॉस मराठी ३ मुळे जयला प्रसिद्धी मिळाली. त्याने अनेक रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. तर जयची पत्नी हर्षला एक सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आहे.