महाराष्ट्राची वाघीण येतेय! जान्हवी किल्लेकरला लॉटरी लागली, हिंदी रिएलिटी शो 'The 50'मध्ये घेणार एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 11:00 IST2026-01-24T10:59:45+5:302026-01-24T11:00:28+5:30
'बिग बॉस मराठी'नंतर जान्हवीचं नशीबच उजळलं आहे. जान्हवीला लॉटरी लागली असून नव्या हिंदी रिएलिटी शोमध्ये ती लवकरच एन्ट्री घेणार आहे. द फिफ्टी 'The 50' या रिएलिटी शोमध्ये जान्हवीची वर्णी लागली आहे.

महाराष्ट्राची वाघीण येतेय! जान्हवी किल्लेकरला लॉटरी लागली, हिंदी रिएलिटी शो 'The 50'मध्ये घेणार एन्ट्री
'बिग बॉस मराठी ५'मुळे जान्हवी किल्लेकर चर्चेत आली होती. 'बिग बॉस मराठी'चं मागचं पर्व जान्हवीने गाजवलं होतं. यंदा 'बिग बॉस मराठी ६'च्या प्रेस कॉन्फरन्सचं जान्हवीने सूत्रसंचालनही केलं. 'बिग बॉस मराठी'नंतर जान्हवीचं नशीबच उजळलं आहे. जान्हवीला लॉटरी लागली असून नव्या हिंदी रिएलिटी शोमध्ये ती लवकरच एन्ट्री घेणार आहे. द फिफ्टी 'The 50' या रिएलिटी शोमध्ये जान्हवीची वर्णी लागली आहे.
'The 50' या रिएलिटी शोची बरीच चर्चा आहे. ५० सेलिब्रिटी या शोमध्ये सहभागी होणार आहेत. या सेलिब्रिटींमध्ये मराठमोळी जान्हवी किल्लेकरच्या नावाचीही चर्चा होता. आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. 'The 50' शोमध्ये जान्हवी लवकरच एन्ट्री घेणार आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिला 'The 50' या शोचं तिकीट मिळाल्याचं दिसत आहे. "ये शेरनी आ रही है सबको घायल करने लायन के स्पेस मे...", असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.
जान्हवीसोबत निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलदेखील 'The 50' शोमध्ये दिसणार आहेत. तर मराठमोळ्या शिव ठाकरेचीही या शोमध्ये वर्णी लागली आहे. अभिनेत्री रिद्धी डोग्रा, नेहाल चुडासमा, नीलम गिरी, फैजल शेख, रजत दलाल, करण पटेल, मोनालिसा, अर्चना गौतम, प्रिंस नरुला, युविका चौधरी, खानजादी, उर्वशी ढोलकिया या नावांचीदेखील चर्चा आहे. १ फेब्रुवारीपासून हा नवा रिएलिटी शो सुरू होणार आहे.