'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेला पोलिसांनी केली अटक; काही दिवसांपूर्वीच झालेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 12:09 IST2026-01-04T12:06:37+5:302026-01-04T12:09:28+5:30

बिग बॉस मराठी फेम जय दुधाणेला पोलिसांनी अटक केली असून त्याला मुंबई विमानतळावरच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Bigg Boss Marathi fame Jai Dudhane arrested by police at mumbai airport | 'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेला पोलिसांनी केली अटक; काही दिवसांपूर्वीच झालेलं लग्न

'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेला पोलिसांनी केली अटक; काही दिवसांपूर्वीच झालेलं लग्न

'बिग बॉस मराठी ३'चा उपविजेता, अभिनेता आणि मॉडेल जय दुधाणेला पोलिसांनीअटक केली आहे. जयला मुंबई विमानतळावरुन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जयने बनावट कागदपत्रं तयार करुन लोकांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. यामुळे फक्त जयच नव्हे तर त्याच्या कुटुंबातील आई, बहीण, आजी, आजोबा यांचीही चौकशी केली जाणार आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

जयला पोलिसांनी केली अटक, प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जय दुधाणेने बनवट कागदपत्र तयार करुन लोकांना दुकानं विकली. दुकानांच्या या विक्रीचा व्यवहार जयने बेकायदेशीरपणे झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे ही दुकानं खरेदी केलेल्या अनेक लोकांचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. जयने केलेली ही फसवणूक ५ कोटींची असल्याचंही उघड झालंय. त्यामुळे जय आणि त्याच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंबंधी जय किंवा त्याच्या टीमने कोणतंही अधिकृत स्टेटमेंट दिलं नाही. जय या प्रकरणात खरंच दोषी आहे का, हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.




जय दुधाणेबद्दल सांगायचं तर, त्याने 'बिग बॉस मराठी ३'मध्ये जबरदस्त खेळ करुन शोचं उपविजेतेपद पटकावलं. जय दुधाणे हा अभिनेता असून जिम व्यावसायिकही आहे. तो लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात काम करणार आहे. जयने काहीच दिवसांपूर्वी त्याची गर्लफ्रेंड हर्षला पाटीलशी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला काहीच दिवस झाले असताना जयला अटक झाली आहे. जयने खरंच लोकांची फसवणूक केली आहे का, हे लवकरच कळून येईल.

Web Title : 'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाने को पुलिस ने किया गिरफ्तार

Web Summary : 'बिग बॉस मराठी 3' फेम जय दुधाने को मुंबई एयरपोर्ट पर नकली दस्तावेज बनाने और अवैध रूप से दुकानों की बिक्री में लोगों को धोखा देने के आरोप में गिरफ्तार किया गया है। उनके परिवार की भी जांच चल रही है। उन्होंने हाल ही में हर्षला पाटिल से शादी की थी।

Web Title : 'Bigg Boss Marathi' fame Jay Dudhane arrested by police

Web Summary : 'Bigg Boss Marathi 3' fame Jay Dudhane has been arrested at Mumbai airport for allegedly creating fake documents and defrauding people in illegal shop sales. His family is also under investigation. He recently married Harshala Patil.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.