"कृपया गाडीचे पायदान आणि...", एसी ट्रेनमध्ये दिसली मराठमोळी अभिनेत्री, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 11:14 IST2024-03-11T11:14:24+5:302024-03-11T11:14:56+5:30

Video : मराठमोळ्या अभिनेत्रीला लोकलची भुरळ, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

bigg boss marathi fame actress ruchira jadhav travelled by mumbai local train shared video | "कृपया गाडीचे पायदान आणि...", एसी ट्रेनमध्ये दिसली मराठमोळी अभिनेत्री, व्हिडिओ व्हायरल

"कृपया गाडीचे पायदान आणि...", एसी ट्रेनमध्ये दिसली मराठमोळी अभिनेत्री, व्हिडिओ व्हायरल

लोकल हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकल ही मुंबईची लाइफलाइन आहे. पण, सर्वसामान्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनाही मुंबई लोकलचं आकर्षण आहे. अनेक सेलिब्रिटी कधी कधी ट्राफिकचा वेळ वाचवण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. मुंबई लोकलमधली सेलिब्रिटींचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधव हिला मुंबई लोकलची भुरळ पडली आहे. 

रुचिराने नुकतंच मुंबईच्या एसी लोकलने प्रवास केला. वेस्टर्न लाइनवरील ट्रेनने रुचिराने विरार ते चर्चगेट असा प्रवास केला. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत रुचिरा एसी लोकलच्या डब्यात बसलेली पाहायला मिळत आहे. तिने गॉगल लावला असल्यामुळे रुचिराला ओळखणं कठीण होत आहे. हा व्हिडिओ शेअर करत रुचिरा म्हणते, "कृपया गाडीचे पायदान आणि फलाटामधील अंतरावर लक्ष द्या. विरार ते चर्चगेट प्रवास केला. बऱ्याच दिवसांनंतर लोकलने प्रवास केला. त्या सर्व मुंबईकरांना सलाम जे रोज गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास करतात. हेच मुंबईचं स्पिरीट आहे. आज एअरपोर्ट लूक नाही...आज आमची मुंबई लोकल लूक". 

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून रुचिरा घराघरात पोहोचली. रुचिराने अनेक सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी ४'मध्ये रुचिरा तिचा बॉयफ्रेंड रोहित शिंदेबरोबर सहभागी झाली होती. 

Web Title: bigg boss marathi fame actress ruchira jadhav travelled by mumbai local train shared video