"आता तू मला शिकवणार...", वयाने मोठ्या असलेल्या सागर कारंडेसोबत तन्वीची हमरी तुमरी, चाहत्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:41 IST2026-01-14T16:41:33+5:302026-01-14T16:41:55+5:30
तन्वीने सागर कारंडेला नॉमिनेट केल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा तन्वीने सागरला अरे तुरे केल्याने चाहते भडकले आहेत.

"आता तू मला शिकवणार...", वयाने मोठ्या असलेल्या सागर कारंडेसोबत तन्वीची हमरी तुमरी, चाहत्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दोनच दिवसांत स्पर्धकांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली आहे. आज यंदाच्या पर्वातील पहिला नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. ज्या सदस्याला घरातून बाहेर काढायचे आहे. त्या सदस्याची पतंग कापायची आहे. नॉमिनेशन टास्कवरुन तन्वी आणि सागरमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. तन्वीने सागर कारंडेला नॉमिनेट केल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा तन्वीने सागरला अरे तुरे केल्याने चाहते भडकले आहेत.
नॉमिनेशन टास्कवरुन सागर कारंडे आणि तन्वीमध्ये हमरी तुमरी झाल्याचंही पाहायला मिळतं. "सागर कारंडे या शोसाठी अपात्र आहेत", असं म्हणत तन्वीने सागरला नॉमिनेट केलं. त्यानंतर सागरचा पाढा चढल्याचं दिसलं. तो तन्वीला म्हणाला, "आपण काय बोलतोय एवढी तर अक्कल पाहिजे". त्यानंतर तन्वी म्हणते, "मी नॉन्सेस आहे हे बोलायची गरज नाहीये". ते ऐकून सागरचा पारा अजून चढतो. तो तन्वीला म्हणतो, "मी तुला आधीच म्हटलेलं मी बोलत असताना मध्ये बोलू नकोस". मग तन्वी त्याला म्हणते, "ऐ आवाजाला मी घाबरत नाही... तू मला शिकवणार".
'बिग बॉस मराठी'च्या घरातील हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यांनी यावर कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी तन्वीची कानउघाडणी केली आहे. "कलाकारांचा सन्मान करावा", "मोठ्या माणसांना नीट बोलायला शिक अगोदर", "तिला माहितीये सागरचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्याशी नडली तर प्रसिद्धी मिळेल", "हिची पहिल्या दिवसापासून ओव्हरअॅक्टिंग सुरू आहे", "हिला कसं बोलायचं ते कळत नाही", अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. आता बिग बॉस मराठीच्या घरातील पहिल्या नॉमिनेशन टास्कमध्ये कोणकोणते स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत, ते आज कळेल. पण, बिग बॉस मराठीचं हे नवं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आलं आहे.