Bigg Boss Marathi 6: वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या सदस्याचा प्रवास संपणार, एका महिन्यातच घराबाहेर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 14:56 IST2026-03-21T14:55:29+5:302026-03-21T14:56:27+5:30
एका महिन्यापूर्वीच घरात एन्ट्री घेतलेला वाइल्ड कार्ड सदस्य घराबाहेर जाणार आहे. त्यामुळे घरातील सदस्यांनाही धक्का बसणार आहे.

Bigg Boss Marathi 6: वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या सदस्याचा प्रवास संपणार, एका महिन्यातच घराबाहेर?
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'चा दहावा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर प्रेक्षकांना अनपेक्षित धक्का मिळणार आहे. या आठवड्यात घरातील एका सदस्याचा प्रवास संपणार असून त्याचं नावंही समोर आलं आहे. एका महिन्यापूर्वीच घरात एन्ट्री घेतलेला वाइल्ड कार्ड सदस्य घराबाहेर जाणार आहे. त्यामुळे घरातील सदस्यांनाही धक्का बसणार आहे.
या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले होते. विशाल कोटियन, संस्कृती साळुंके, सागर कारंडे, रेवा कौरासे, प्रभू शेळके, राकेश बापट आणि दिपाली सय्यद हे सदस्य नॉमिनेट झाले होते. यापैकी काही सदस्यांवर घराबाहेर जाण्याची टांगती तलवार होती. यापैकी रेवा कौरासे आणि संस्कृती साळुंके यांनी महिन्याभरापूर्वीच बिग बॉस मराठीच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. त्यापैकी संस्कृती साळुंकेचा प्रवास आता संपणार आहे. या आठवड्यात संस्कृती साळुंके घरातून एक्झिट घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू असून बिग बॉस मराठीचे अपडेट्स देणाऱ्या एका इन्स्टाग्राम पेजवरुन याबाबत पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

रिअॅलिटी शोमुळे संस्कृती साळुंके घराघरात पोहोचली होती. जाऊ बाई गावात या रिएलिटी शोमध्ये ती झळकली होती. बिग बॉसच्या घरात येताच संस्कृतीने तिची पॉवर की गमावली होती. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच तिला घरातील सदस्यांनी वीक स्पर्धक म्हणून पाहायला सुरुवात केली होती. अखेर आता तिला घरातून एक्झिट घ्यावी लागली आहे.