एक नव्हे 'बिग बॉस मराठी'च्या घरात ३ वाइल्ड कार्ड एन्ट्री, मराठी अभिनेत्यासोबत येणार बोल्डनेसची क्वीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 16:01 IST2026-02-28T16:01:21+5:302026-02-28T16:01:21+5:30
दोन आठवड्यांपूर्वी घरात राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. आता घरात दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. पण घरात एक नव्हे तर तीन सदस्य हे वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहेत.

एक नव्हे 'बिग बॉस मराठी'च्या घरात ३ वाइल्ड कार्ड एन्ट्री, मराठी अभिनेत्यासोबत येणार बोल्डनेसची क्वीन
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा खेळ जसजसा पुढे जात आहे. तसंतसं घरातील समीकरणं बदलताना दिसत आहेत. खेळात टिकून राहण्यासाठी घरातील सदस्य टास्कमध्ये वेगवेगळ्या शक्कल लढवताना दिसत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी घरात राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. आता घरात दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. पण घरात एक नव्हे तर तीन सदस्य हे वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरात मोठा धमाका होणार आहे. या तीन वाइल्ड कार्ड सदस्यांच्या एन्ट्रीमुळे घरातील स्पर्धकांना मोठं सरप्राइज मिळणार असून खेळ आणखी रंगतदार होणार आहे. या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमध्ये एक मराठी अभिनेता, हिंदी अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा समावेश आहे. हिंदी अभिनेत्री रेवा कौरसे बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यामध्ये आता आणखी दोन कलाकारांची नावं जोडली जात आहेत. रेवा कौरसेसोबत अभिनेता संकेत पाठक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर संस्कृती साळुंखे बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेणार आहेत.
संकेत पाठक हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. लग्नाची बेडी, छत्रीवाली या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. तर संस्कृती साळुंखे ही सोशल मीडिया स्टार आहे. जाऊ बाई गावात, रिएलिटी राणीज ऑफ जंगल या शोमध्ये ती दिसली होती. आता या तिघांच्या वाइल्ड कार्ड एन्ट्री खेळ कसा बदलतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.