संकेत पाठकने लग्न झाल्याचं लपवलं! 'बिग बॉस'च्या घरात घमासान, राखी म्हणाली- "तू चीटर आहेस, लग्न झालं तरी मुली पटवतोस..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:03 IST2026-03-10T17:02:15+5:302026-03-10T17:03:00+5:30

बिग बॉसच्या घरातील एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत आणि संकेतमध्ये जोरदार भांडण होत असल्याचं दिसत आहे.

bigg boss marathi 6 sanket pathak and rakhi sawant video actor hide truth that he is married | संकेत पाठकने लग्न झाल्याचं लपवलं! 'बिग बॉस'च्या घरात घमासान, राखी म्हणाली- "तू चीटर आहेस, लग्न झालं तरी मुली पटवतोस..."

संकेत पाठकने लग्न झाल्याचं लपवलं! 'बिग बॉस'च्या घरात घमासान, राखी म्हणाली- "तू चीटर आहेस, लग्न झालं तरी मुली पटवतोस..."

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी ६'मध्ये गेल्याच आठवड्यात अभिनेता संकेत पाठकने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली. बिग बॉसच्या घरात आल्यापासूनच त्याने गेम खेळायला सुरुवात केली आहे. कॅप्टन्सी टास्क दरम्यानही संकेतने त्याच्या तल्लख बुद्धीचा वापर करत योग्य रणनीती आखल्याचं दिसलं होतं. भाऊच्या धक्क्यावर रितेशने त्याचं कौतुकही केलं होतं. मात्र आता घरात असं काही झालंय ज्यामुळे संकेतचा पारा चढल्याचं दिसत आहे. 

बिग बॉसच्या घरातील एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत आणि संकेतमध्ये जोरदार भांडण होत असल्याचं दिसत आहे. राखी संकेतला म्हणते, "तू चीटर आहेस, तुझ्यात गट्स नाहीयेत". मग संकेतला तिला विचारतो की "मी कोणाला फसवलंय सांग?". त्यावर राखी त्याला म्हणते, "तुझं लग्न झालंय. तू चीटर आहेस. तू मुली पटवतोस". त्यानंतर संकेतचा पारा आणखीनच चढतो. तो राखीला म्हणतो, "मला लाइन क्रॉस करायला लावू नकोस". त्यानंतरही दोघांमध्ये मोठा वाद झाल्याचं दिसत आहे. 


संकेतने घरातील सदस्यांपासून लग्न झाल्याचं लपवल्याने हा वाद सुरू झाला. पण दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये त्याने राखी आणि राकेश बापटला हे स्पष्ट केलं की पर्सनल लाइफबद्दल तो इथे बोलू इच्छित नाही. "मी सिंगल आहे असं म्हटलं नाही", असंही संकेत बोलल्याचं दिसत आहे. 


दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरातून गेल्या आठवड्यात रुचिता जामदार हिने एक्झिट घेतली. रुचिताचं एलिमिनेशन हा सगळ्यांसाठीच मोठा धक्का होता. आता या आठवड्यात घरात नॉमिनेशन टास्क पार पडेल. त्यामध्ये कोणते सदस्य नॉमिनेट होतील, हे पाहावं लागेल. 

Web Title : संकेत पाठक ने शादी छुपाई! बिग बॉस में घमासान, राखी ने कहा धोखेबाज।

Web Summary : बिग बॉस मराठी 6 में राखी ने संकेत पर शादी छुपाने और फ़्लर्ट करने का आरोप लगाया। संकेत ने निजी जीवन की जानकारी का खुलासा करने से इनकार किया, जिससे तीखी बहस हुई। हाल ही में रुचिता जामदार बाहर हो गईं।

Web Title : Sanket Pathak hides marriage! Big Boss fight, Rakhi calls him cheater.

Web Summary : Rakhi accused Sanket in Bigg Boss Marathi 6 of hiding his marriage and flirting. Sanket denied revealing his personal life details, leading to heated arguments. Ruchita Jamdar was recently eliminated.