"भूत पाहिलं काय?", 'बिग बॉस'च्या घरात बायकोला पाहून जोरात ओरडला सागर कारंडे, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 17:13 IST2026-03-26T17:13:25+5:302026-03-26T17:13:59+5:30
सागरची पत्नी आणि मुलगी त्याला सरप्राइज देण्यासाठी स्टोअर रुममध्ये असतात. त्यांना पाहून सागर मोठ्याने ओरडत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

"भूत पाहिलं काय?", 'बिग बॉस'च्या घरात बायकोला पाहून जोरात ओरडला सागर कारंडे, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'मध्ये या आठवड्याच फॅमिली वीक साजरा केला जाणार आहे. या वीकमध्ये स्पर्धकांच्या घरातील सदस्य त्यांना भेटण्यासाठी बिग बॉसच्या घरात येणार आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातील हा आठवडा स्पेशल असणार आहे. संकेत पाठक, दिपाली सय्यद, प्रभू शेळके यांचे कुटुंबीय घरात आल्यानंतर आज अभिनेता सागर कारंडेची पत्नी आणि मुलगी त्याला सरप्राइज देण्यासाठी येणार आहेत.
बिग बॉसच्या घरातील एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बिग बॉस सागरला स्टोअर रुममधून माइक बदलायला सांगतात. पण स्टोअर रुममध्ये गेल्यानंतर सागरला मोठा धक्काच बसतो. सागरची पत्नी आणि मुलगी त्याला सरप्राइज देण्यासाठी स्टोअर रुममध्ये असतात. त्यांना पाहून सागर मोठ्याने ओरडत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर त्याला अश्रू अनावर होतात. सागरला पाहून त्याची पत्नी आणि मुलगीही रडू लागतात. त्यानंतर सागर आणि त्याच्या पत्नीसाठी टोळी गँगमधील सदस्य संकेत पाठक, अनुश्री आणि विशाल खास डान्सही करतात. मात्र हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी सागरला ट्रोल केलं आहे.
कलर्स मराठीने शेअर केलेल्या बिग बॉस मराठीच्या घरातील या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. सागरला जोरात ओरडल्याचं पाहून चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. "सागरने भूत पाहिलं का?", "एवढं नाटक करायची काय गरज आहे", "तुमची बायको आहे ती...भूत पाहिल्यासारखं का ओरडताय?", "ओव्हर अॅक्टिंगची दुकान बंद करा", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.