संकेतला "चोमू" म्हणणाऱ्या रुचिताला रुपालीने दिला दम, म्हणाली- "त्याला काही बोलायचं नाही, नाहीतर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 14:50 IST2026-03-06T14:50:05+5:302026-03-06T14:50:22+5:30
रुपालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन स्टोरी शेअर करत रुचिताला चांगलंच सुनावलं आहे.

संकेतला "चोमू" म्हणणाऱ्या रुचिताला रुपालीने दिला दम, म्हणाली- "त्याला काही बोलायचं नाही, नाहीतर..."
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या घरात गेल्या आठवड्यात तीन वाइल्ड कार्ड सदस्यांनी एन्ट्री घेतली. संकेत पाठक, रेवा कौरासे आणि संस्कृती साळुंखे यांनी घरात एन्ट्री घेताच घरातील समीकरणं बदलताना दिसत आहे. या तिघांनीही त्यांचा खेळ खेळायला सुरुवात केली आहे. वाइल्ड कार्डने घरात एन्ट्री घेताच रुचिता जामदारचं रेवासोबत वाजलं होतं. त्यानंतर आता तिने संकेतला चोमू म्हटलं आहे. यावरुन रुपाली भोसले भडकली आहे.
रुपालीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन स्टोरी शेअर करत रुचिताला चांगलंच सुनावलं आहे. "रुचिता तू काय पहिल्या दिवसापासूनच गेम खेळायला लागलीस का? संकेत दिसत नाही. त्याचा गेम कळत नाही. ब्लाह ब्लाह ब्लाह... अगं तुझा गेम काय आहे? विशालच्या मागेपुढे करणं? सतत विक्टिम कार्ड प्ले करणं आणि रडत राहणं...आता कुठे गेला तुझा तोरा? आणि आत्मसन्मान? संकेत पाठकबद्दल काही बोलायचं नाही. तुला किती माहितीये तो? तू बोललीस की तो चोमू आहे... शांतपणे घेऊन गेला समृद्धीला... पण तो तसाच आहे. पण तुला नाही कळणार कारण तू जेन्टलमॅन मुलं पाहिलीच नाहियेस. संकेत बाहेर सुद्धा तसाच आहे आणि घरात सुद्धा तसाच आहे. तो आमचा मित्र आहे. त्यामुळे तुझ्यापेक्षा आम्ही त्याला जास्त ओळखतो", असं रुपालीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, घरात नव्या कॅप्टन्सीसाठी टास्क खेळवण्यात आला. यामध्ये राखी सावंत पुन्हा एकदा घराची कॅप्टन झाली आहे. राखीने एन्ट्री घेतल्यापासून आणि नव्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीनंतर घरातील गेम पुन्हा बदलला आहे. या आठवड्यात प्राजक्ता शुक्रे, दिपाली सय्यद, प्रभू शेळके, रुचिता जामदार, सागर कारंडे, तन्वी कोलते आणि संस्कृती साळुंखे हे सदस्य नॉमिनेट आहेत. यातील एका स्पर्धकाचा प्रवास या आठवड्यात संपणार आहे.