"आमच्यात काहीच होऊ शकत नाही, वयाचा इतका फरक...", घराबाहेर येताच विशालसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच बोलली रुचिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:39 IST2026-03-10T12:38:32+5:302026-03-10T12:39:06+5:30

रुचिताने घरातून एक्झिट घेतल्यानंतर विशाल ढसाढसा रडला होता. मात्र आता घरातून बाहेर आल्यानंतर रुचिताने लोकमत फिल्मीशी बोलताना त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. 

bigg boss marathi 6 ruchita jamdar talk about relationship with vishal kotian after elimination | "आमच्यात काहीच होऊ शकत नाही, वयाचा इतका फरक...", घराबाहेर येताच विशालसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच बोलली रुचिता

"आमच्यात काहीच होऊ शकत नाही, वयाचा इतका फरक...", घराबाहेर येताच विशालसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच बोलली रुचिता

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या गेल्या आठवड्यात रुचिता जामदारने घरातून एक्झिट घेतली. रुचिताच्या एक्झिटने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. घरातील सदस्य आणि चाहतेही आश्चर्यचकित झाले होते. घरात रुचिता आणि विशालचं नातं घट्ट झालं होतं. त्यांच्या प्रेम आहे की काय, असा प्रश्न अनेकदा विचारला गेला. त्यांना ट्रोलही केलं गेलं होतं. रुचिताने घरातून एक्झिट घेतल्यानंतर विशाल ढसाढसा रडला होता. मात्र आता घरातून बाहेर आल्यानंतर रुचिताने लोकमत फिल्मीशी बोलताना त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. 

रुचिता म्हणाली, "आमच्यामध्ये १०० संवाद होत होते त्यातलं फक्त शेवटचं एकच दाखवलं जात होतं. विशाल मला बोलत होता की संस्कृती जी बाहेरुन आलीये ती आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करतेय. आणि तू त्या गोष्टीमुळे इन्फ्लुएन्स होऊन आपलं नातं का तोडतेस? आणि मी त्याला सांगत होते की हे जरा का बाहेर असं दिसतंय तर ते मला नकोय. शेवटी मग माझं असं झालं की मला नाही राहवत आहे. आमचं नातं कधीच मैत्रीच्या पलिकडे नव्हतं. जलसी मला सगळ्यांबाबत होती. प्राजक्ता ताईसोबतही मला ते फील झालं होतं. मी रोशन दादालाही बोलायचे की तू तन्वीसोबत उठतो बसतोस मला खूप जलस फील होतं. पण दाखवलं तेच गेलं. विशालपेक्षा दहा पटीने जास्त मी रोशन दादासोबत कनेक्ट होते". 

"दिपाली ताईलाही मी बोलले होते की हे प्रेम नाहीये. इमोशनल अटॅचमेंट आहे. त्या घरामध्ये जेव्हा सगळे तुमच्या विरुद्ध आहेत आणि एकच माणूस सोबत असेल तर त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असणारच ना... बाहेर आल्यावरही आमची फ्रेंडशिप तशीच असणार आहे. आमच्यात वयाचा इतका फरक आहे की काहीच होऊ शकत नाही हे आम्हाला खूप जास्त माहीत आहे. हे आम्ही खूप वेळा बोललोही पण दाखवलंच नाही. विशाल तर मला हे पण बोलला की तुझ्या लग्नात सगळ्यात जास्त मीच नाचेल. तुला जो पण मुलगा आवडेल त्याला घेऊन माझ्याकडे ये मी सांगेन तो मुलगा तुझ्यासाठी बरोबर आहे की नाही ते... हेदेखील तो बोलला. पण हे कुठेच दिसलं नाही. हे एक मित्रच एका मैत्रिणीसाठी बोलू शकतो. पण त्यांनी जे दाखवलंय ते कधीच नव्हतं", असं तिने स्पष्ट केलं आहे. 

Web Title : विशाल के साथ रिश्ते पर रुचिता का खुलासा, उम्र का बहुत फासला है।

Web Summary : बिग बॉस मराठी 6 से बाहर निकलने के बाद रुचिता जामदार ने विशाल के साथ अपने रिश्ते को स्पष्ट किया। उन्होंने जोर देकर कहा कि उनका बंधन सिर्फ दोस्ती का था, उम्र के अंतर और घर के भीतर भावनात्मक लगाव के कारण प्रेम अफवाहों को खारिज किया। उन्होंने कहा कि विशाल उनकी शादी में सबसे ज्यादा डांस करेंगे।

Web Title : Huge age gap: Ruchita clarifies relationship with Vishal after Bigg Boss.

Web Summary : Ruchita Jamdar clarifies her relationship with Vishal after exiting Bigg Boss Marathi 6. She emphasizes their bond was just friendship, dismissing romantic rumors due to their age difference and emotional attachment within the house. She also stated that Vishal would dance the most at her wedding.