Video: "मी तिला पटवणार...", रेवाची एन्ट्री होताच रुचिताचा पत्ता कट? विशाल कोटियनचा भलताच गेम प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 16:45 IST2026-03-02T16:45:03+5:302026-03-02T16:45:31+5:30
एकाच वेळी तीन नव्या सदस्यांनी घरात एन्ट्री घेतल्याने आता खेळ पूर्णपणे बदलल्याचं दिसणार आहे. त्यामुळे घरातील सदस्यांना नवी स्ट्रॅटेजी करावी लागणार आहे.

Video: "मी तिला पटवणार...", रेवाची एन्ट्री होताच रुचिताचा पत्ता कट? विशाल कोटियनचा भलताच गेम प्लॅन
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात रविवारी भाऊच्या धक्क्यावर तीन वाइल्ड कार्ड सदस्यांनी एन्ट्री घेतली आहे. या सदस्यांच्या घरातील एन्ट्रीमुळे चाहत्यांनाही मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर घरातील स्पर्धकही आश्चर्यचकित झाले आहेत. एकाच वेळी तीन नव्या सदस्यांनी घरात एन्ट्री घेतल्याने आता खेळ पूर्णपणे बदलल्याचं दिसणार आहे. त्यामुळे घरातील सदस्यांना नवी स्ट्रॅटेजी करावी लागणार आहे.
घरात येताच रेवा कौरासे हिने रुचिताशी पंगा घेतला. दोघींमध्ये छोटं भांडण झाल्याचं दिसलं. यावरुन रुचिता विशालशी बोलत होती. रुचिता म्हणाली, "तिने आल्या आल्या का माझ्याशी वाद घातला?". त्यावर विशाल म्हणाला, "कोण रेवा? तिला आपल्या दोघांना भिडायचंय...पण मी तिला पटवणार. पटू दे ना...काय नाय...फक्त पटू दे. मला माझा गेम खेळू दे. मला थांबवू नकोस. भरोसा ठेव फक्त. तुझ्याचकडे येणारे मी...रोज बोलेन तुझ्याशी". विशालचं बोलणं ऐकून रुचिता नाराज होते.
बिग बॉसच्या घरात रेवा कौरासे, संस्कृती साळुंखे आणि संकेत पाठक यांनी घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे. याआधी राखी सावंतने वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली होती. आता या तिघांच्या एन्ट्रीने गेम पलटणार की आणखी रंगतदार होणार, हे पाहावं लागेल.