तन्वीला पाडलं, तिच्या अंगावर बसला अन्...; राकेश बापटने ओलांडल्या सगळ्या मर्यादा, रितेशने काढली खरडपट्टी, म्हणाला- "तुम्ही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:24 IST2026-03-14T13:24:22+5:302026-03-14T13:24:47+5:30
तन्वीने राकेशला अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर राकेशने तिला खाली पाडलं आणि तो तिच्या अंगावर बसला. यामुळे त्याला ट्रोलही केलं गेलं.

तन्वीला पाडलं, तिच्या अंगावर बसला अन्...; राकेश बापटने ओलांडल्या सगळ्या मर्यादा, रितेशने काढली खरडपट्टी, म्हणाला- "तुम्ही..."
Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात झालेल्या टास्कमध्ये राकेश बापट कडून मर्यादा ओलांडल्या गेल्याचं दिसलं. लाल रंगाच्या चावीपासून स्वत:ला दूर ठेवत डेंजर झोनमध्ये जाण्यापासून वाचवण्याचा हा टास्क होता. यामध्ये दोन टीम पाडल्या गेल्या होत्या. या दोन्ही टीमला फ्रीजमध्ये दिसणारे पदार्थ जसेच्या तसे लावायचे होते. पहिला राऊंड व्यवस्थित पार पडला. पण दुसऱ्या राऊंडमध्ये राकेशने दुसऱ्या टीमचे पदार्थ फ्रीजमधून खाली पाडले. त्यानंतर तन्वी आणि राकेशमध्ये वाद झाल्याचं दिसलं. तन्वीने राकेशला अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर राकेशने तिला खाली पाडलं आणि तो तिच्या अंगावर बसला. यामुळे त्याला ट्रोलही केलं गेलं.
आता यावरुन भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख राकेशला चांगलचं सुनावणार असल्याचं दिसत आहे. भाऊच्या धक्क्याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रितेश राकेशची चांगलीच खरडपट्टी काढताना दिसत आहे. "राकेश...तुमची एक हिस्ट्री आहे की तुम्ही टास्क रद्द करता. खेळायचं नसेल तर जाऊ नका. राकेश तुम्ही तन्वीला खाली पाडलं आणि तिच्या अंगावर जाऊन बसलात. ते नाही आवडलं प्रेक्षकांना... तुम्हाला लोकांच्या कमेंट्स दाखवतो, बघा", असं स्पष्ट शब्दात म्हणत रितेशने राकेशचा समाचार घेतला.
दरम्यान, या आठवड्यात प्राजक्ता शुक्रे, दिपाली सय्यद, तन्वी कोलते, अनुश्री माने, संकेत पाठक आणि रेवा कौरासे हे सदस्य नॉमिनेट झाले होते. यापैकी प्राजक्ता शुक्रेचा 'बिग बॉस'च्या घरातील प्रवास संपणार आहे. गोड गळ्याची गायिका बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार आहे. चाहते आणि घरातील सदस्यांसाठीदेखील हा एक प्रकारे धक्काच आहे.