“तूच या आठवड्याचा खरा डॉन”, रितेश देशमुखकडून प्रभू शेळकेचं तोंडभरुन कौतुक, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 17:30 IST2026-01-17T17:28:50+5:302026-01-17T17:30:42+5:30

यंदाच्या सीझनमधील पहिला भाऊचा धक्का पार पडणार आहे. यामध्ये रितेश देशमुख प्रभूचं भरभरुन कौतुक करणार आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. 

bigg boss marathi 6 ritesh deshmukh appreciate prabhu shelke for his performance promo | “तूच या आठवड्याचा खरा डॉन”, रितेश देशमुखकडून प्रभू शेळकेचं तोंडभरुन कौतुक, म्हणाला...

“तूच या आठवड्याचा खरा डॉन”, रितेश देशमुखकडून प्रभू शेळकेचं तोंडभरुन कौतुक, म्हणाला...

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वात छोटा डॉन प्रभू शेळकेच्या एन्ट्रीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पहिल्या दिवसापासून रीलस्टार असलेला प्रभू शेळके बिग बॉसच्या घरात त्याच्या परीने चाहत्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे. घरातील सदस्यांसोबतही तो मिळून मिसळून राहत आहे. यंदाच्या सीझनमधील पहिला भाऊचा धक्का पार पडणार आहे. यामध्ये रितेश देशमुख प्रभूचं भरभरुन कौतुक करणार आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. 

प्रभुने आपल्या साध्या आणि विनोदी स्वभावाने प्रेक्षकांचे तसेच रितेश भाऊचेही मन जिंकले आहे. त्याच्या मनोरंजनाच्या शैलीवर भाष्य करताना रितेश देशमुख म्हणाला, "प्रभु, बाहेरच्या दुनियेत तुम्ही एका कॅमेराने कंटेंट बनवता. इथे १०० कॅमेरे आहेत. तुम्ही हसवलत, तुम्ही रडवलत. मी बाकी सगळ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही यांना छोटे समजत आहात, पण या आठवड्यातले हे खरे एंटरटेनमेंटचे डॉन आहेत!" रितेशने कौतुक केल्यानंतर प्रभु शेळके भावूक झाला आणि त्याने नम्रपणे सर्वांचे आभार मानले. घरात इतर सदस्यांच्या तुलनेत प्रभु जरी शांत वाटत असला तरी, त्याच्या या 'डॉन' अवताराने आता सदस्यांमध्ये त्याची एक वेगळीच दहशत निर्माण होईल यात शंका नाही. 


दरम्यान, कॅप्टन्सी टास्क जिंकून प्राजक्ता शुक्रे यंदाच्या सीझनची पहिली कॅप्टन ठरली आहे. तर करण सोनावणे, सागर कारंडे, प्रभू शेळके, दिव्या शिंदे, दिपाली सय्यद, रोशन भजनकर, रुचिता जामदार, राधा पाटील आणि अनुश्री माने हे सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. 

Web Title : रितेश देशमुख ने प्रभु शेळके की प्रशंसा की: 'तुम ही असली डॉन हो'

Web Summary : रितेश देशमुख ने बिग बॉस मराठी 6 में प्रभु शेळके के मनोरंजन की सराहना की और उन्हें सप्ताह का 'असली डॉन' कहा। शेळके की सरल और विनोदी स्वभाव ने दिल जीत लिया है। प्राजक्ता शुक्रे पहली कप्तान बनीं, जबकि कई सदस्य बेदखली के लिए नामांकित हुए।

Web Title : Riteish Deshmukh praises Prabhu Shelke: 'You are the real Don'

Web Summary : Riteish Deshmukh lauded Prabhu Shelke's entertainment in Bigg Boss Marathi 6, calling him the 'real Don' of the week. Shelke's simple and humorous nature has won hearts. Prajakta Shukre became the first captain, while several members got nominated for eviction.