'बिग बॉस'च्या घरात राखीचा हायव्होल्टेज ड्रामा! सागर कारंडेशी थेट भिडली, रागात काचेची बाटलीच फोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:47 IST2026-02-13T13:46:44+5:302026-02-13T13:47:22+5:30
राखीने थेट घराचा कॅप्टन असलेल्या सागर कारंडेसोबत वाद घातला आहे. ज्यामुळे घरात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.

'बिग बॉस'च्या घरात राखीचा हायव्होल्टेज ड्रामा! सागर कारंडेशी थेट भिडली, रागात काचेची बाटलीच फोडली
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या घरात ड्रामा क्वीन राखी सावंतने कल्ला केला आहे. एन्ट्री केल्यापासूनच राखीने बिग बॉसचं घर डोक्यावर घेतलं आहे. घरात आल्यापासून राखी घरातील सदस्यांशी पंगा घेताना दिसत आहे. आता राखीने थेट घराचा कॅप्टन असलेल्या सागर कारंडेसोबत वाद घातला आहे. ज्यामुळे घरात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.
प्रोमोमध्ये दिसतंय की राखीने वॉशरुम साफ नसल्यावरुन घरात राडा घातला आहे. ती सदस्यांना वॉशरुममध्ये किती घाण आहे हे पाहा, असं दाखवत आहे. त्यावर सागर म्हणतो, "तू नाही दाखवायची घाण...मी वॉचमन नाहीये". त्यावरुन दोघांमध्ये वाद होतात. राखी त्याला म्हणते, "आम्ही जेवण बनवतो ते खाता ना...मग हे सगळं साफ करायचं". त्यानंतर मात्र सागरचा पारा चढतो. तो राखीवर चिडतो आणि तिला म्हणतो की "नाही करत जा...". सागरचा राग मनात घेऊन राखी वॉशरुममधून बाहेर येते आणि किचनमध्ये जाऊन रागात काचेची बाटली फोडली. त्यानंतर घरातील सदस्य तिला बाटली का फोडली? असं विचारताना दिसत आहेत.
राखीमुळे पुन्हा एकदा घरात हायवोल्टेज ड्रामा झाल्याचं पाहायला मिळणार आहे. घरात आल्यापासूनच राखी सदस्यांना सळो की पळो करून सोडत आहे. दरम्यान, या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी करण सोनावणे, प्रभू शेळके, सचिन कुमावत, राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे, आयुष संजीव हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यातील कोणाचा प्रवास संपणार हे पाहावं लागेल.