'Bigg Boss Marathi'च्या घरात साजरा झाला माघी गणेशोत्सव, राकेश बापटने स्वत:च्या हाताने मातीपासून घडवली बाप्पाची सुंदर मूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:27 IST2026-01-23T12:27:09+5:302026-01-23T12:27:57+5:30
Ganesh Jayanti Celebration in Bigg Boss: बिग बॉस मराठीच्या घरात गणेशोत्सव कधीच साजरा झाला नव्हता. आता पहिल्यांदाच घरात माघी गणेशोत्सव साजरा होत आहे.

'Bigg Boss Marathi'च्या घरात साजरा झाला माघी गणेशोत्सव, राकेश बापटने स्वत:च्या हाताने मातीपासून घडवली बाप्पाची सुंदर मूर्ती
Bigg Boss Marathi 6: सगळीकडे माघी गणेशोत्सवाचा उत्साह असताना बिग बॉस मराठीचं घरंही गणरायाच्या आगमनाने प्रफुल्लित झालं आहे. बिग बॉसच्या इतिहासात शोमध्ये पहिल्यांदाच माघी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. बाहेरच्या जगाशी घरातल्या सदस्यांचा संपर्क नसला तरी बिग बॉसच्या घरात सगळे सण साजरे केले जातात. याआधीच्या सीझनमध्येही अनेक सण साजरे केले गेले होते. पण बिग बॉस मराठीच्या घरात गणेशोत्सव कधीच साजरा झाला नव्हता. आता पहिल्यांदाच घरात माघी गणेशोत्सव साजरा होत आहे.
माघी गणेशोत्सवासाठी गणरायाचा भक्त असलेल्या राकेश बापटने स्वत:च्या हाताने बाप्पाची मूर्ती घडवली आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या व्हिडीओत राकेश मातीपासून गणपती बाप्पाची मूर्ती घडवताना दिसत आहे. त्याने घडवलेली सुंदर मूर्ती पाहून घरातील सदस्यही आश्चर्यचकित झाले. त्यानंतर वाजत गाजत गणरायाची स्थापना घरातील सदस्य करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सगळे मिळून बाप्पाची पूजा करून नेवैद्य दाखवून गणेशोत्सव साजरा करतात.
राकेशने साकारलेली मूर्ती आणि प्राजक्ताचे भजन
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरात दुसऱ्या आठवड्यासाठी कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कमध्ये आयुष संजीव आणि रोशन भजनकर हे कॅप्टन्सीचे उमेदवार ठरले आहेत. आता आज त्यांच्यामध्ये कॅप्टन्सीसाठी टास्क खेळवला जाणार आहे. आयुष आणि रोशन यांच्यापैकी दुसरा आठवड्यात कॅप्टन कोण बनणार हे पाहणं रंजनकारक ठरणार आहे.